RTO customer Complaints esakal
जळगाव

Jalgaon : वाहन नूतनीकरणास आरटीओकडून टाळाटाळ; वाहनधारकाची तक्रार

मिलींद वानखेडे

सावदा (जि. जळगाव) : प्रवासी रिक्षाचे पासिंग (Rikshaw Passing) व नूतनीकरणासाठी अर्ज (Renewal application) देऊनही जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Jalgaon Sub-Regional Transport Office) टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार वाहनमालक अनिल शिंदे यांनी केली आहे. (RTO avoids vehicle renewal Vehicle owners complaint Jalgaon News)

अनिल शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची ऑटो रिक्षा (एमएच १९, व्ही १५५४) यावर ऑटो परमीट काढलेले होते. त्याचा परवाना क्रमांक ४८३९ हा असून, हे वाहन स्क्रॅब केलेले होते. त्या ऑटो रिक्षाचे परमीट नवीन वाहन क्रमांक एमएच १९, सीडब्ल्यू २२५५ यावर २०१९ मध्ये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर हा परवाना नूतनीकरण मार्च २०१९ मध्ये करावयाचे असल्याने त्यासाठी आपण चारित्र्य पडताळणी दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन) हा सावदा पोलिस ठाणे कार्यालयाकडून १ मार्च २०१९ ला घेतला होता. तसेच हे ऑटो रिक्षा परवाना नूतनीकरण प्रकरण परिवहन कार्यालयाकडे २ मार्च २०१९ ला दाखल केलेले होते.

त्यानंतर वाहन क्रमांक एमएच १९, सीडब्ल्यू २२५५ या गाडीचे पासिंगचे प्रकरण देखील २५ सप्टेंबर २०२० ला केलेले होते. असे ऑटो रिक्षा नूतनीकरण आणि वाहन पासिंग अशी दोन्ही प्रकरणे परिवहन कार्यालयाकडून आजपर्यंत झालेली नाही. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून कार्यालयाला प्रकरणे सादर केलेली आहेत. तरीही अद्याप परवाना नूतनीकरण आणि गाडीची पासिंग झालेली नाही. ते त्वरित न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT