ganja tree esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ग्रामीण पोलिसांनी गांजा कापून केला पंचनामा; 38 लाखांचा माल हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगामधील उत्तमनगर येथील रहिवासी रवी किलाऱ्या पावरा याच्या तुरीच्या शेतामध्ये गांजाची शेती केल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी शेतात आपला मोर्चा वळवित तब्बल ८ क्विंटल वजनाचा दोन ट्रॅक्टर ओला गांजा जप्त केला.

ही कारवाई शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास केली आहे. (rural police cut ganja and made panchnama dhule crime news)

यात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जमा केलेल्या जवळपास ८ क्विंटल ओल्या गांजाची किंमत सुमारे ३८ लाख रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उत्तमनगर येथे रवी किलाऱ्या पावरा या शेतकऱ्याने तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास मिळाली होती. त्याआधारावर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास धाड टाकली.

यात तुरीच्या शेतामध्ये आंतरपीक असलेले ओला हिरवा गांजाची झाडे कापून सुमारे ८ क्विंटल वजन असलेले दोन ट्रॅक्टर गांजा जप्त करीत पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानंतर नायब तहसीलदार सचिन बांबोडे यांनी पंचनामा केला. सरकारी पंच म्हणून कनिष्ठ अभियंता बालाजी दहीफळे यावेळी उपस्थित होते.

कारवाईत रवी किलाऱ्या पावरा फरार झाला असून त्याचा अल्पवयीन भाऊ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कारवाई पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवालकर, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहा फौजदार देविदास ईशी, हवालदार राकेश पाटील, किरण पाटील, पोलिस शिपाई रावसाहेब पाटील, प्रमोद पारधी, विशाल जाधव, दिलीप पाटील आदींनी केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H5N5 Virus: 'बर्ड फ्लू'च्या दुर्मिळ विषाणूचा धोका वाढला, 'इथे' झाला पहिला मृत्यू; आरोग्य विभागाकडून निवेदन

Agriculture News : द्राक्षपंढरीची व्यथा! 80% उत्पादन घट, आता निर्यातक्षम द्राक्ष तपासणीच्या 10 हजार खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

Latest Marathi News Live Update : पेण नगरपालिकेच्या वतीने मतदारांसाठी जनजागृती रॅली

आमदारांना ओळखलं नाही अन् उभा न राहिल्यानं डॉक्टरना, नोटीस बजावणं असंवेदनशील; हायकोर्टानं सरकारला फटकारलं

IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, भारताच्या कुलदीप यादवला ३ विकेट्स; पहिल्या दिवशी काय घडलं?

SCROLL FOR NEXT