Amarnath Shrine
Amarnath Shrine esakal
जळगाव

Sakal Impact : अमरनाथ यात्रेकरूंना मिळणार गावातच वैद्यकीय प्रमाणपत्र

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अमनाथ यात्रेकरूंना आता वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे येण्याची आवश्‍यकता नाही. (sakal impact Amarnath pilgrims will get medical certificate in village itself jalgaon news)

हे प्रमाणपत्र आता सबंधित गावातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हारूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातच मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किरण पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली.

याबाबत ‘सकाळ’ने शनिवारी (ता. २२) ‘अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भावीकांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी हेलपाटे’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत डॉ. पाटील यांनी आरोग्य सेवा संचालकांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर संचालकांनी ग्रामीण पातळीवर प्रमाणपत्र देण्याचे अधिकार दिले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अमरनाथ यात्रेकरूंना यात्रेसाठी आवश्यक असणारे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक (सर्व राज्यातील) यांना होते. परंतु यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये व स्थानिक पातळीवरच वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून आरोग्य सेवा संचालकांनी आता हे अधिकार वाढविले असून, ग्रामीण स्तरावर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व ग्रामीण रुग्णालये,

सर्व उपजिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधिक्षक, अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या इच्छुक सर्व भाविक यात्रेकरूंनी आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व गैरसोय टाळावी, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT