Councilor Shuchita Hada while showing the news in 'Sakaal' to the hall.
Councilor Shuchita Hada while showing the news in 'Sakaal' to the hall. esakal
जळगाव

Sakal Impact : 17 मजलीतील भंगाराचे गुदाम इतरत्र हलविणार; ‘सकाळ’ वृत्ताची दखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सतरा मजली इमारतीच्या मागील बाजूस अतिक्रमण विभागाचे साहित्य ठेवण्यासाठी गुदाम तयार करण्यात येत आहे.

मात्र, नगरसेवकांची हरकत असल्यास ते इतरत्र हलविण्यात येईल, अशी माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Vidya Gaikwad) यांनी दिली. (sakal news impact 17 storey scrap warehouse will be shifted elsewhere from municipal corporation jalgaon news)

‘सकाळ’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या आधारावर महासभेत भाजपच्या नगरसेविका ॲड. शूचिता हाडा यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्याला आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी उत्तर दिले.

सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या आवारात मागील बाजूस भंगाराचे गुदाम तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबत ‘सकाळ’ने बुधवारी (ता. १५) ‘महापालिकेकडे जागा असतानाही प्रशासकीय इमारतीचे विद्रुपीकरण केले जात आहे’, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

भाजप नगरसेविका ॲड. शूचिता हाडा यांनी ‘सकाळ’च्या अंकातील या वृत्तानुसार महासभेत प्रश्‍न उपस्थित केला. त्यांनी सभागृहात अंकाचे वृत्तही दाखविले. त्या म्हणाल्या, की सतरा मजली इमारतीमागील बाजूस भंगाराचे गुदाम केले जात असून, सतरा मजलीचे विद्रुपीकरण का केले जात आहे?

तसेच सतरा मजली इमारतीत कोणतीही सुरक्षा नाही. अनेक ठिकाणी वायरी उघड्यावर आहेत. सभागृहाचेही अद्याप नूतनीकरण झालेले नाही. सीसीटीव्हीही सुरू नाहीत. सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न आहे, याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

आयुक्तांचे उत्तर

यावर उत्तर देताना आयुक्त डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, की अतिक्रमण विभगााचे भंगार साहित्य पहिल्या मजल्यावर जमा केले आहे. ते साहित्य ठेवण्याठी हे गुदाम तयार करण्यात येत आहे.

मात्र, नगरसेवकांचा आक्षेप असेल, तर आपण रद्द करून इतरत्र हलविणार आहोत. सतरा मजलीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून सभागृहाच्याही नूतनीकरणाचे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवाजीनगर ‘टी’ पुलाबाबत चर्चा

शिवाजीनगरातील उभारण्यात येणाऱ्या ‘टी’ आकाराच्या पुलाबाबत नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी प्रश्‍न उपस्थित केला. ते म्हणाले, की शिवाजीनगर ‘टी’ आकाराचे पुलाचे काम सुरू करण्यात येणार होते.

मात्र, ते थांबविले आहे. ते काम केव्हा सुरू करणार? यावर उत्तर देताना आयुक्त गायकवाड म्हणाल्या, की शिवाजीनगर टी आकाराच्या पुलाबाबत पदाधिकारी व प्रशासन यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

कारण याबाबत आपल्याकडे पुलाचे काम सुरू करा, तसेच त्याचे काम सुरू करू नये, अशा मागणीचेही निवेदन आले आहेत. त्यामुळे याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. स्थानिक नगरसेवकांनाही चर्चेस बोलवावे, अशी मागणी दारंकुडे यांनी केली. आयुक्तांनी ती मान्य केली.

पिंप्राळा अग्निशमनची जागा बदल

पिंप्राळा येथे उभारण्यात येणाऱ्या ‘मॉडेल अग्निशमन’ केंद्र गट क्रमांक सातमध्ये करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, नगरसेविका प्रतिभा कापसे, विजय पाटील यांनी जागा बदलण्याची मागणी केली. त्यानुसार उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी गट १९९ मध्ये हे केंद्र उभाण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. त्याला एकमताने मंजुरी दिली. सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी हा प्रस्ताव दिला.

असोदा रस्त्यावरील जागेचा प्रश्‍न मिटला

असोदा रस्त्यावरील मोहन टाकीजजवळील खुली जागा परिसरातील जनतेला विविध कार्यक्रमासाठी द्यावी, अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोर्चाही आणला होता.

महासभेत जागेच्या प्रस्ताववर चर्चा झाली. जागेच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने कोणतीही रक्कम आकारू नये, असे मत नगरसेवक कैलास सोनवणे यानी व्यक्त केले. नितीन लढ्ढा यांनीही त्याला अनुमोदन दिले आणि एकमताने हा प्रस्ताव मंजूर झाला. आता कोणतीही रक्कम न आकारता परिसरातील नागरिकांना ही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT