The work started by the municipality after taking note of the report of 'Sakal' regarding the bad condition of Hirapur road.  esakal
जळगाव

Sakal Impact : चाळीसगावात खड्डेमय रस्त्यांवर मुरूम टाकण्याचे काम सुरू; ‘सकाळ’च्या वृत्ताची तत्काळ दखल

सकाळ वृत्तसेवा

Sakal Impact : शहरातील हिरापूर रस्त्यावरील डेअरी भागात भुयारी गटारीच्या कामामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून परिसरातील रहिवासी, विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना मार्गक्रमण करणे देखील कठीण झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे त्या भागातील रस्ता चिखलमय झाला होता. वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले होते. (sakal news impact In Chalisgaon work of putting Murum on potholed roads is going on nashik news)

याबाबत 'सकाळ'ने शुक्रवारच्या (ता. ७) अंकात वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेने त्याची त्वरित दखल घेतली आणि त्या रस्त्यावर तीन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील चिखल एका बाजूला करण्यात आला.

त्यानंतर तात्पुरता मुरूम टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्या परिसरातील रहिवाशांनी ‘सकाळ’च्या वृत्ताचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, पालिकेचे माजी नगरसेवक विनोद पल्लण यांनी देखील ‘सकाळ’चे आभार मानले असून, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना भेटून दुरवस्थेबाबत त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

पालिकेच्या माजी नगराध्यक्ष लिलाताई पाटील, न्यायाधीश, नायब तहसीलदार यांचे निवासस्थान त्याच भागात आहेत. त्या रस्त्याला तर गटारीच नसल्यामुळे रस्त्यावरच पाणी साचते, त्या भागातही अशीच परिस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT