Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेत बायोमेट्रीक हजेरीनुसार वेतन; चेहऱ्याचे होणार स्कॅनिंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिका कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रीक हजेरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सप्टेंबरच्या वेतनाला बिलंब झाला आहे.

मात्र यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासन नवीन ३६ बायोमेट्रीक मशिन खरेदी करणार असून यापुढे बायोमेट्रीक हजेरीनुसारच प्रमाणेच अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन करण्यात येणार आहे. (Salary based on Biometric Attendance in Municipal Corporation jalgaon news)

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून बायोमॅट्रीक हजेरी लागू करण्यात आली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सप्टेंबरचे वेतन अद्यापही झालेले नाही.

तर काही कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक मशिनमध्ये नोंदणी न झाल्याने त्यांची हजेरी लागू शकलेल्या नाही. तर, काही कर्मचाऱ्यांचे थम्ब मशिनमध्ये हजेरी रेकॉर्ड झालेले नाहीत, तसेच रेकॉर्ड झालेल्या हजेरींची पडताळणी करण्यासाठी आस्थापना विभागात पाठविण्यात आल्या आहेत.

त्यामुळे भविष्यात अशा अडचणी टाळण्यासाठी महापालिकेकडून ५० नवीन बायोमॅट्रीक मशिनची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ३६ मशिन खरेदी केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित मशिन खरेदी केले जातील.

चेहरा स्कॅनिंग होणार

महापालिका नवीन पद्धतीच्या बायोमेट्रीक मशिन खरेदी करणार आहेत. यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचा थम्ब घेतला जात नसेल तर, चेहरा देखील स्कॅन करण्याची व्यवस्था आहे. तसेच नेट बंद असेल तर मोबाईलच्या हॉटस्पॉटवर देखील हे मशिन चालू शकेल व वीज पुरवठा खंडित झाला असला तरी देखील मशिन सुरु राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT