Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : वाळूमाफियांकडून तलाठी, कोतवालास जीवे ठार मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : कंडारी येथे तापी नदीपात्रात अवैधरित्या वाळू आणि माती उत्खनन केले जात आहे. या ठिकाणी कारवाईस गेलेल्या तलाठी व एक महिला अधिकारी व कोतवाल यांना माफियांकडून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

कंडारी येथील तापी नदीपात्रात अवैधरित्या वाळू, डबर आणि माती उत्खनन केले जाते. याची माहिती मिळाली असता कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकास काहींनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. भीतीपोटी या कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल केली नसल्याची चर्चा आहे. (Sand mafia threatens to kill Talathi Kotwal Jalgaon News)

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

अलीकडच्या काळात तालुक्‍यामध्ये वाढलेली बेरोजगारी लक्षात घेता अनेक तरुणांनी कमी काळात जास्त उत्पन्नाची संधी म्हणून अवैध धंद्यांचा आसरा घेतला. यामध्ये बेरोजगार असलेल्या अनेक तरुणांनी सहभाग घेतला. या अवैध व्यवसायांना अप्रत्यक्षरीत्या पोलिसांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांना अधिकच संधी मिळत गेली. त्यामध्ये गुटखा, वाळू, दारू या गोष्टींचा तालुक्‍यात प्रादुर्भाव वाढत गेला.

अशा व्यवसायांवर मुळापासून कारवाई करण्याची गरज आहे; अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांना धाक दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळूमाफिया भविष्यात पोलिसांवरही आपला धाक दाखवण्यास कमी पडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT