esakal
जळगाव

Jalgaon NCP News : संजय पवार अखेर राष्ट्रवादीतून बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदी निवडीनंतर धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बडतर्फ करण्यात आले आहे.

त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवण्यात आला असून, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी बुधवारी (ता. १७) यासंदर्भात आदेश काढले. (Sanjay Pawar finally dismissed from NCP jalgaon news)

जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाने ॲड. रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिलेली असताना श्री. पवार यांनी स्वत: उमेदवारी अर्ज दाखल करत विरोधात भूमिका घेतली. तसेच, अन्य संचालकांच्या मदतीने अध्यक्षपदही मिळविले. तेव्हाच त्यांच्या भूमिकेबद्दल जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील यांनी प्रदेश नेतृत्वाकडे तक्रार केली होती.

धरणगाव बाजार समिती निवडणुकीतही स्वतंत्र

त्यानंतर नुकत्याच झालेल्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाकडून कुठलीही परवानगी नसताना व स्वत: कुठल्याही पदावर नसताना शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलतर्फे निवडणूक लढवत असल्याचे फलक त्यांनी लावले.

पक्षात कुठलाही गट नसताना त्यांनी संजय पवार गट असा उल्लेख, त्यावर पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांची छायाचित्रे छापून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. फलक काढून टाकण्याच्या सूचना केल्यानंतरही त्यावर कार्यवाही केली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशा प्रकारे पक्षविरोधात कृत्य केल्यामुळे पक्षातून १६ मेपासून बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्र पवार यांना पाठविण्यात आले आहे. पत्रावर सरचिटणीस गर्जे यांची स्वाक्षरी आहे.

मंत्री महाजनांना दिलेल्या शुभेच्छांची जाहिरात

भाजप नेते तथा राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांचा बुधवारी (ता. १७) वाढदिवस होता. त्यानिमित्त संजय पवार यांनी वृत्तपत्रातून शुभेच्छा जाहिरात दिली होती. त्यातही विविध पक्षीय नेत्यांची छायाचित्रे वापरली आहेत. या जाहिरातीचीही आज दिवसभर चर्चा होती.

"माझी पक्षातील बडतर्फी मला दु:ख देणारी आहे. मी पक्ष, चिन्हाविरोधात कोणतेही काम केलेले नाही. माझा खुलासाही न घेता एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. माझ्या हृदयात शरद पवार, अजित पवार कायम राहणार आहेत. सहकार क्षेत्रात त्यांचा फोटो मी यापुढेही वापरणार आहे. मी जिल्हा बँकेत अध्यक्ष झाल्याने वरिष्ठांकडे माझ्या खोट्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचीही माझ्याकडे कोण कुणाला भेटतं याची माहिती आहे. ती मी वरिष्ठांना भेटून देणार आहे." -संजय पवार, अध्यक्ष, जळगाव जिल्हा बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Fifa World Cup 2026 : लोकसंख्या डोंबिवलीपेक्षाही कमी, पण जिद्द हिमालयाएवढी! 'हा' चिमुकला देश वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीला नडला

Solapur: अंनिसच्या प्रयत्नांना यश: अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुटका करत महिलेची 'जटा' केली मुक्त!

Sangli Satara Election: विधान परिषद निवडणुकीत मोठी रणनीती! भाजपचे सदस्य अज्ञातस्थळी हलवणार, क्रॉस वोटिंगची धास्ती?,सांगली-सातारा विधान परिषद लढतीत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT