जळगाव

सासूचा पराभव करणा-या उच्चशिक्षित सुनेस मिळाली सरपंचपदाची संधी

आल्हाद जोशी

एरंडोल : खडकेखुर्द येथे ग्रामपंचायत निवडणुकीत चुलत सासूचा पराभव करणा-या उच्च शिक्षित सुनेस सरपंचपदाची संधी मिळाली आहे.केवळ एकवीस वर्ष वय असणा-या उच्चशिक्षित सुनेवर गावाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आल्यामुळे ग्रामस्थांच्या विकासाबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत.

खडकेखुर्द ग्रामपंचायातीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांच्या panal समोर युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील यांनी आव्हान उभे केले होते.शिवसेनेच्या दोन प्रमुख पदाधिका-यांचे panal एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती.या निवडणुकीत उच्चशिक्षित असलेल्या सायली राजेंद्र पाटील या सुनेने चुलत सासू आणि माजी सरपंच असलेल्या सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले होते.

उच्चशिक्षीत सूनेचा विजय

सासू सुनेच्या लढतीकडे तालुक्यासह राजकीय पदाधिका-यांचे लक्ष लागले होते.या निवडणुकीत उच्चशिक्षित सुन सायलीने माजी सरपंच असलेल्या सिंधुबाई पाटील यांचा पराभव करून राजकीय क्षेत्रात जोरदार प्रवेश केला.सायली पाटील ह्या शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांच्या पुतणी असून मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच राजेंद्र पाटील यांच्या कन्या आहेत.सायली पाटील यांचे माहेर खडकेसिम येथील असून सासर खडकेखुर्द येथील आहे.दोन्ही गावे जवळपास एकत्रच असल्यामुळे सायली पाटील यांचे सासर व माहेर एकाच असल्याचे बोलले जाते.प्रभागातील मतदारांनी प्रस्थापित माजी सरपंचऐवजी नवख्या आणि उच्चशिक्षित असलेल्या सुनेला विजयी करून ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाउल उचलले आहे.

जिल्ह्यातील सर्वात तरूण सरपंच होण्याचा मान

सरपंचपद महिला आरक्षित निघाल्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी देखील सायली पाटील याना सरपंचपदाची संधी दिली.तर अशोक किसान पाटील या अनुभवी सदस्याला उपसरपंचपदाची संधी दिली.उच्चशिक्षित सायली पाटील यांचे वय केवळ 21 वर्ष असून जिल्ह्यात सर्वात तरुण सरपंच होण्याचा बहुमान त्याना मिळाला आहे.मतदारांनी मला प्रभागात विजयी केले तर सदस्यांनी सरपंचपदाची संधी दिल्यामुळे जबाबदारी वाधाली असून सर्वाना विश्वासात घेवून गावाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सायली पाटील यांनी सांगितले.युवकांनी राजकीय क्षेत्रात येवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT