जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) पाय वाकडे आणि अस्थी व्यंग असणाऱ्या बालकांवर यशस्वी उपचार झाले. आता दिव्यांग बालकाऐवजी सर्वसामान्य बालकांप्रमाणे त्यांना आयुष्य जगता येणार आहे. बालकांवर यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व जीएमसीच्या पथकाने ही अवघड शस्त्रक्रिया केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मतः वाकडे पाय असलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी पालक येतात. त्यातील काही दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याच्या आशेने येतात. मात्र, बाळाला असणारे अस्थी व्यंग दुरुस्त होऊ शकते, असा आशावाद डॉक्टर पालकांना देत आहेत. परिणामी, आतापर्यंत दहापेक्षा अधिक बालकांना दिव्यांग होण्यापासून वाचविले आहे.(Saved 10 children from becoming disabled Success of JSSC team Jalgaon News)
रुग्णालयात अस्थी व्यंगोपचार विभागात नुकतेच जामनेर येथील दोन महिन्यांचा शुभम, चोपड्याचा चार महिन्यांचा आरीश आणि असोदा येथील दोन महिन्यांची कल्याणी या तीन बालकांवर यशस्वी उपचार झाले. वैद्यकीय पथकाने सलग दोन महिने पालकांना योग्य मार्गदर्शन आणि बालकांवर उपचार करून पाय पूर्णपणे सरळ करण्यात यश मिळविले. बाळांचे पाय जन्मतः दिव्यांग असल्याने पालक चिंतित होते.
मात्र, आता बाळ पूर्णपणे सर्वसामान्य झाल्यामुळे पालकांनी वैद्यकीय पथकांचे आभार मानले. नुकतेच अधिष्ठाता डॉ. रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या उपस्थितीत बालकांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. बालकांवर अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. पंकज घोगरे, डॉ. शंतनू भारद्वाज, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. प्रणव समृतवार, डॉ. सचिन वाहेकर यांनी उपचार केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.