polise  
जळगाव

नदीच्या पूलावरून तरुण उडी मारणार; तोच देवदूत म्हणून पोलिस आला, आणि वाचविले प्राण  

रईस शेख

जळगाव : बांभोरीजवळ गिरणा नदीवरील पुलावरून उडी घेणाऱ्या तरुणाला कवेत घेत पोलिस कर्मचाऱ्याने बाजूला केले. क्षणाचा विलंब झाला असता, तर दोनशे फुटावरून खाली पडल्याने क्षणार्थात तरुणाचा मृत्यू झाला असता. मात्र, ड्यूटीवरून घरी येणारे पोलिस कर्मचारी घनश्‍याम पवार यांनी त्याचा नुसता जीवच वाचविला नाही, तर समजूत घालून त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.

पोलिस कर्मचारी धनःश्‍याम पवार पाळधी नाक्यावरून रात्री आठला ड्यूटी संपल्याने दुचाकीवरून घराकडे निघाले होते. बांभोरीजवळील गिरणा नदीच्या पुलावर रात्री ३० वर्षीय तरुण पुलाच्या कठड्यावर उभा राहून स्वतःला झोकून देण्याच्या तयारीत हेाता. क्षणाचाही विलंब न करता घनश्‍याम यांनी त्या तरुणाच्या कंबरेत हात घालत बाजूला ओढले. नंतर त्याची चौकशी केल्यावर रणजित सूर्यवंशी (रा. जैनाबाद, जळगाव) असे त्याने नाव सांगितले. त्याच्याशी गप्पा मारून आत्महत्त्येचे कारणही विचारले आणि त्याची समजूत घालून कुटुंबियांना बोलाविले. काही वेळातच तरुणाचे नातेवाइकांसह काका-काकू आले. घडला प्रकार कळाल्यावर आईला रडू कोसळले. वयोवृद्ध आईवडिलांनी जीव वाचवणाऱ्या पोलिसाचे आभार मानले. 

डोक्यावर झाले कर्ज
आपल्यावर कर्ज झाले असून, हातउसनवारीसह बँकाकडून घेतलेल्या कर्जासाठी पैसे मागणारे पिच्छा पुरवत असल्याने आपण बेजार झाल्याचे रणजित सूर्यवंशी याने सांगितले.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20I : हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन; दोन वर्षांनंतर तगडा खेळाडू परतणार, भारताची संभाव्य Playing XI

Crime News : शेजाऱ्याशी संबंध ठेवताना लेकरानं पाहिलं, आईनं पोटच्या पोराला संपवलं; पोलीस पतीने...

Dada Bhuse : "हिंदुत्वाशी तडजोड नाही, पण इस्लाम पक्ष सेक्युलर"; दादा भुसेंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक एकत्र कोकण भवनला जाणार

Vasant Panchami 2026: वसंत पंचमीचा खरा आनंद अनुभवायचा आहे? भारतातील 'या' 5 ठिकाणांना आजच भेट द्या

SCROLL FOR NEXT