जळगाव

खोदा पहाड निकला चुहा.. राज्यातील सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवरील शिक्षकांंची स्थिती

उमेश काटे

अमळनेर: एकीकडे शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची भाषा करते तर दुसरीकडे आदिवासी तुकडीवरील शिक्षकांच्या पगाराबाबत प्रचंड उदासीनता दाखवीत आहे. पाच महिने उलटून गेले तरी शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील १९ जिल्ह्यातील २१ सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवरील शिक्षकांच्या पगारासाठी साडेनऊ कोटींची गरज असताना शासनाने केवळ ७५ लाख मंजूर करून तोंडाला केवळ पाने पुसली आहेत. या निधीत एका महिन्याचाही पगार होत नसल्याने ‘खोदा पहाड निकला चुहा’ याची प्रत्यक्ष अनुभूती आली आहे. 

राज्य शासनाने २००८-२००९ पासून राज्यातील १९ जिल्ह्यांतील २१ सैनिकी शाळेत स्वतंत्र आदिवासी तुकडी सुरू केली. या तुकडीवर सद्यःस्थितीत ३१९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी आदिवासी विकास विभागाची आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र लेखाशीर्ष ‘एच ९७३’ची निर्मिती केली आहे. त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो. आदिवासी विभाग हा शालेय शिक्षण क्रीडा मंत्रालयाला वेतन अनुदान दर महिन्याला तुटपुंज्या स्वरूपात अनियमितपणे देतात. पर्यायाने हे पगार शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयमार्फत अनियमितपणे होत असल्यामुळे पगार थकीत झालेले आहे.

कोरोनाच्या काळात अनियमितता

त्यात कोरोना काळात निधीअभावी पगार देण्याबाबत अनियमितता आली आहे. सद्यःस्थितीत राज्यातील सैनिकी शाळांमधील आदिवासी तुकडीवरील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या पाच महिन्यांचे पगार थकीत आहेत. 

‘प्लॅन टू नॉन- प्लॅन’ केल्यास पगार नियमित 
राज्यातील सैनिकी शाळांमधील आदिवासी तुकडींवरील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हे सद्य:स्थितीत ‘योजनाअंतर्गत’ म्हणजे प्लॅनमध्ये होत असल्याने पगाराच्या निधीची दर महिन्यात तरतूद करावी लागते. त्यामुळे पगार अनियमित होतात. मात्र, हेच पगार ‘योजनाअंतर्गत’मधून ‘योजनाबाह्य’ अर्थात ‘प्लॅन टू नॉन-प्लॅन’ केल्यास पगार नियमित होऊ शकतात. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे (अर्थसंकल्प) उपसचिव राजेंद्र पवार यांनी लेखाशीर्ष २२०२/९७३ सह इतर हे नॉनप्लॅन अर्थात योजना बाह्यमध्ये समाविष्ट करण्याबाबत विभागस्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे लेखी पत्र चार महिन्यांपूर्वी आमदार बाळाराम पाटील, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार श्रीकांत देशपांडे यांना दिले होते. मात्र याचे ही घोडे कुठे अडले, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT