जळगाव

जळगावमध्ये शाळा बंदबाबत आज होणार निर्णय 

देविदास वाणी

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शाळा बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत आज निर्णय घेणार आहेत. जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. एस. पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान, काही खासगी शाळांनी दक्षता म्हणून त्यांच्या स्तरावर बुधवार (ता. २४)पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

आवर्जून वाचा- नियोजन चुकलेच ! पण उत्तरदायित्य कुणाचे? 

स्थानिक पातळीवर असा निर्णय ते घेऊ शकतात. मात्र, जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील तो सर्व शाळांवर बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सलग दोन-तीन दिवसांपासून दीडशेच्या वर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. अनलॉकनंतर सर्व शाळा पहिली ते पाचवी वगळता अंतराअंतराने सुरू झाल्या होत्या.

शाळेत पालकांच्या संमतीपत्राशिवाय विद्यार्थ्यांना येऊ दिले जात नव्हते. सोबतच सॅनिटायझर, मास्क लावणे आवश्‍यक केले होते. दक्षता म्हणून काही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नव्हते. अगोदर दिवसाआड शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. १५ फेब्रुवारीपासूनच सर्वच महाविद्यालये सुरू झाली. मात्र, त्यानंतर कोरोना रुग्ण वाढतच आहेत. संसर्ग कमी होण्यासाठी शाळा बंद करायच्या किंवा कशा पद्धतीने शाळा घ्यावयाच्या याबाबतचा निर्णय आज बैठकीत घेण्यात येणार आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack:रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी...

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT