School esakal
जळगाव

उन्हाळी सुटीतही भरली क्षमता आणि कौशल्ये विकसित करणारी शाळा

विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुटीतील वर्ग नुकताच घेण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा (जि. जळगाव) : तब्बल दोन वर्षांपासून कोरोना (Corona) काळात बहुसंख्य विद्यार्थी (Students) वेगवेगळ्या कारणांनी ऑनलाइन अध्ययनाच्या (Online education) प्रक्रियेपासून दूर होते. त्यांच्यातील क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुटीतील वर्ग नुकताच घेण्यात आला. शाळेच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांची उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक स्तरांवरील क्षमता आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी पालकांच्या अनुमतीने कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात २३ एप्रिल ते १४ मे अशा २१ दिवसांचा विशेष शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या नावीण्यपूर्ण उपक्रमासंदर्भात मुख्याध्यापक एच. बी. मोरे यांनी वार्षिक परीक्षेअगोदर पालकांची सहविचार सभा घेऊन त्यात माहिती दिली होती. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती करून घेण्यासह त्यांना मुलभूत क्रिया समजावून सांगणे तसेच मराठी, इंग्रजी व गणित विषयाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. पालकांच्या संमतीने घेण्यात आलेल्या या वर्गात प्रगत व अप्रगत असे विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना लेखन, वाचनासह गणिते सोडवण्यासंदर्भात शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या वर्गाचा समारोप झाल्यानंतर विद्यार्थ्यांची झालेली प्रगती पाहून पालकांनी समाधान व्यक्त करुन शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT