school
school Sakal
जळगाव

कोरोनाच्या ‘ब्रेक’ नंतर शाळांची शुल्कवाढ

रईस शेख

जळगाव : कोरोनामुळे अनेक पालकांचा रोजगार अथवा उत्पन्नाचे स्त्रोत हिरावल्यामुळे दोन वर्षे शैक्षणिक शुल्कात सवलत दिल्यानंतर यंदा काही शाळांनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कात तब्बल २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचे सांगितले जात आहे. सोमवारपासून (ता. १३) शहरासह जिल्ह्यातील बहुतांश शाळांना सुरवात होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे ऑनलाइन शिक्षणात गेल्यानंतर मुलांना शाळेत जाण्याची आतुरता आहे.

शैक्षणिक वर्षे २०-२१ ते २१-२२ या काळात कोरोना महामारीमुळे शाळा- महाविद्यालये बंद होती. त्यावर उपाय म्हणून शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला व तो राबविलाही.

शुल्क कमी केले

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक पालकांचा रोजगार हिरावला. काहींचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित झाले. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये शाळांनी शैक्षणिक शुल्कात काही प्रमाणात सवलत दिली होती.

पुन्हा शुल्कवाढ

दोन वर्षे सवलत देऊन शैक्षणिक शुल्क घेतल्यानंतर आता शैक्षणिक संस्थांनी पुन्हा उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शुल्कवाढ केली आहे. यात काही इंग्रजी माध्यमांच्या व कॉन्व्हेंट स्कूल आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. काही शाळांनी तब्बल २५ ते ३० टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ केल्याचे सांगितले जातेय. या शुल्कवाढीमुळे एकपेक्षा अधिक पाल्य असणाऱ्या पालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शुल्कासाठी तगादा

शाळा सुरु होण्यापूर्वीच इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पुढच्या वर्गात प्रवेश देण्याच्या निमित्ताने पालकांकडे वाढीव फिची मागणी केली आहे. फी भरण्या संदर्भात मॅसेज शाळांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुप वरुन फिरत आहेत.

दोन टप्प्यात हवे शुल्क

गेल्या दोन वर्षांत शाळांनी शैक्षणिक शुल्क कमी करुन ते भरण्यासाठीही चार टप्पे करुन दिले होते. या वेळी मात्र, दोनच टप्यात पूर्ण शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. शैक्षणिक शुल्कवाढीसोबतच यंदा युनिफॉर्म, वह्या- पुस्तके, शैक्षणिक साहित्यही महागले आहे. त्यामुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

काही शाळा अपवाद

असे असले तरी काही शाळांनी कोरोना काळात कमी केलेले शुल्कच कायम ठेवले आहे. पालकांची स्थिती लक्षात घेता शैक्षणिक शुल्कवाढ करणे योग्य नसल्याचे त्यांचे मत आहे.

स्कूलबस भाडेवाढ..

पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या ऑटोरिक्षा, मिनी बसेसच्या दरातही वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, खासगी वाहनधारकांनी चक्क दुप्पट भाडेवाढ सुचवल्याने पालकाची या बाजुनेही अडचण वाढत आहे.

कोरोना काळात काही प्रमाणात शुल्क कमी केले होते, तेच शुल्क यंदाही आकारण्यात येणार आहे. शाळेने कोणतीही शुल्कवाढ केलेली नाही.

- दिनेश ठाकरे (प्रशासन अधिकारी, विवेकानंद प्रतिष्ठान)

केसीई सोसायटीच्या कोणत्याही शाळेत यंदाही शैक्षणिक शुल्कवाढ केलेली नाही.

- संदीप केदार (जनसंपर्क अधिकारी, केसीई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

Fact Check: बांगलादेशी धर्मगुरूचे जुने द्वेषपूर्ण भाषण भारतीय निवडणुकांशी संबंध जोडत होतेय व्हायरल

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

SCROLL FOR NEXT