jalgaon crime news
jalgaon crime news esakal
जळगाव

Dhadkan Crime Case : गुन्हे शाखेकडून दुसऱ्या संशयितला अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जुन्या बसस्थानकाशेजारी लॉटरी गल्ली दारुडे, गंजोटलींसह सट्टा-पत्ता, जुगार आणि ऑनलाइन बिंगो गेमसाठी ‘बदनाम गल्ली’ म्हणून ओळखली जाते. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी दोन गटांतील हल्ल्यात आकाश सपकाळे ऊर्फ धडकन याचा खून झाल्यानंतर त्या मागील कारणांवर सध्या चर्चा सुरू आहे. जुन्या वादातून खून झाल्याचा कांगावा करण्यात येत असला तरी मूळ वाद लॉटरी गल्लीत धंदा सुरू करण्यावरूनच असल्याचे आता समोर येत आहे.

गोपाळ कैलास सैंदाणे ऊर्फ अण्णा, किरणशेठ दारूवाला यांच्यासह इतरांच्या भागीदारीत येथे जुगारअड्डा चालवला जातो. तेथेच सट्टा-सोरट आणि चक्रीसाठी मृत आकाश सुरेश सपकाळे ऊर्फ धडकन याला परवानगी दिल्याने अवैध धंदेवाइकांमध्ये गँगवार उफाळून एक खून, दोन प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा घडला. दाखल गुन्ह्यात ‘भद्रा’ या संशयिताला गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. २१) अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. (Second suspect arrested by crime branch Dhadkan Crime Case jalgaon news)

घटनेमागचे कारण हेच का?

नुकताच २० दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या आकाशला लॉटरी गल्लीत सट्ट्याच्या अड्ड्याला परवानगी मिळाली होती. मात्र, समोरच्या गटातील गोपाळ सैंदाणे, किरणशेठ दारूवाला यांच्या भागीदारीतील जुगारअड्डा पूर्वीपासूनच सुरू होता. जुगारअड्ड्यात आपल्याला पाचवा भागीदार म्हणून घ्यावे किंवा स्वतंत्र सट्ट्याचा अड्डा टाकतो, असे म्हणत आकाश सपकाळे ऊर्फ धडकन याने परवानगी मिळविली होती.

पूर्वीपासून सुरू असलेला जुगारअड्डा चालक चारही भागीदार (पार्टनर)चा आकाशला पाचवा भागीदार म्हणून घेण्यास टोकाचा विरेाध होता. दोन-तीन दिवसांपासून या अड्ड्यावर हल्लेखोर गटातील तीन-चार लोक सतत बैठक लावून असत. घटनेच्या दिवशी पूर्वीपासूनच तिघांनी दारू अड्ड्यावरून पार्सल घेऊन जुगारअड्ड्याशेजारीच मैफल जमवली होती.

हल्ल्यापूर्वीच प्रतिहल्ला

सागर सुरेश सपकाळे, सागर आनंदा कोळी, केशव विलास इंगळे, सनी अशोक साळुंखे, शुभम रवींद्र इंगळे, विशाल लालचंद हारदे या सहा साथीदारांसह धडकन तेथे पोचला. आपल्याच अड्ड्यावर येऊन हल्ला होणार असल्याची टीप गोपाळ सैंदाणे, किरणशेठ यांच्यासह इतर भागीदारांना मिळाल्याने ते तयारीतच राहिले.

आपल्यावर हल्ला होण्याच्या भीतीतून चाकूंनी हल्ला चढवत आकाश ऊर्फ धडकन व त्याच्या साथीदारांवर तुटून पडले. अचानक झालेल्या हल्ल्याने भांबावून गेलेल्या धडकन टोळीला पळताही आले नाही. परिणामी, तिघे गंभीर जखमी झाले. त्यात धडकनचा मृत्यू ओढवल्याचे सांगण्यात येत आहे.

‘तो’ सट्ट्याचा अड्डाच गायब

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लॉटरी गल्लीत किरणशेठच्या जुगाराच्या अड्ड्यावर झालेला एकाचा खून व दोन प्राणघातक हल्ले झाल्याचे सर्वश्रृत आहे. मात्र, मूळ भांडणाचे ठिकाण जुगारअड्डा असताना, पोलिस दरबारी याचा उल्लेख सोयीस्कररीत्या टाळला आहे. जखमी सागरने दिलेल्या जबाबात सर्व अंडाभुर्जीच्या गाडीवर बसले असताना, गोपाळ, नऱ्या ऊर्फ भद्रा, विजू यांनी हल्ला चढवला. त्यात भाऊ आकाशचा मृत्यू ओढवला, तर जखमी अवस्थेत मी नवजीवन सर्कल येथे चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

‘झापडी’ बंद शहर पोलिस ठाणे

शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर गँगवार उफाळून हत्या होते. मुख्य संशयित व सट्टा चालविणारा जखमी अवस्थेत शहर पोलिस ठाण्यात धडकतो. तोपर्यंत पोलिसांना मूळ घटनाच कळत नाही, हे आणखी गंभीर. जिल्हा रुग्णालयात जमाव ऐकवटून पोलिसांत तक्रार देण्यास आलेल्यांनी खून केल्याचे पोलिसांना कळाल्यावर त्यांनी त्यास ताब्यात घेतले. तर त्याचा एक साथीदार पोलिस ठाण्याबाहेरूनच पसार झाला. तो आला होता. अण्णाला भेटला, तोच दुसरा आरोपी असल्याची चर्चा पोलिस ठाण्यात सुरू आहे.

संशयितांच्या अटकेसाठी कोठडी

स्वतःहून पोलिस ठाण्यात आलेल्या गोपाळ सैंदाणे यास गुरुवारी (ता. २१) शहर पोलिसांनी जिल्‍हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गुन्ह्यातील शस्त्र जप्ती, फरार संशयित नऱ्या भद्रा आणि विजू यांच्या अटकेसाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केल्यावर न्यायालयाने तीन दिवस पोलिस केाठडी सुनावली.

गुन्हे शाखेने आणला दुसरा संशयित

यातील गोपाळचा भागीदार व गुन्ह्यातील साथीदार नरेंद्र ऊर्फ भद्रा पंडित सोनवणे (वय ३१, रा. आसोदा) फरारी होता. गुन्हे शोखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, जितेंद्र पाटील, विजय पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राहुल पाटील यांनी संशयित भद्रा यास आसोदा गावातून अटक केली. त्याला शुक्रवारी (ता. २३) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

SCROLL FOR NEXT