Anandacha Shida distribution started in ration shops in district news esakal
जळगाव

Anandacha Shidha : आनंदाची बातमी! 2 वेळा मिळणार ‘आनंदाचा शिधा’; अगोदर येईल त्यालाच लाभ

सकाळ वृत्तसेवा

Anandacha Shidha : जिल्ह्यात राज्य शासनाकडून गौरी-गणपतीच्या पार्श्‍वभूमीवर आनंदाचा शिधा वाटप झाले. केवळ शंभर रूपयात मिळणारा हा आनंदाचा शिधा (चणा दाळ, साखर, तेल, रवा) अनेकांनी घेतला.

मात्र, तब्बल १९ हजार १४७ लाभ धारकांनी तो घेतलाच नाही. यामुळे तो पडून होता. अशीच स्थिती राज्यातील रेशन धान्य दुकानांत होती. ही बाब अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाकडे गेली. त्यांनी शिल्लक शिधा परत ज्यांना दुसऱ्यांदा हवा असेल, त्यांना वितरीत करण्याचे आदेश बुधवारी (ता. ११) दिले आहेत.

यामुळे पूर्वी ज्यांनी ‘आनंदाचा शिधा’चा लाभ घेतला होता, त्यांना पुन्हा शंभर रूपये देवून लाभ घेता येणार आहे. मात्र, जो अगोदर जाईल त्यालाच हा लाभ मिळेल. जो उशिरा पोचेल त्याला मिळणार नाही. (second time anandacha shida will be distributed jalgaon news)

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे कक्ष अधिकारी महेश जाधव यांनी शिल्लक शिधा जिन्नस संचाचे वितरण ‘प्रथम मागणी करणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी ज्यांनी शिधा संच घेतले नसतील, त्यांना अगोदर द्यावे. उरलेले जिन्नस जो प्रथम येइल त्याला देण्यात यावे असे आदेश दिले आहेत. त्यानूसार शिल्लक शिधा संच वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी ‘सकाळ’ला दिली.

तालुकानिहाय आनंदाचा शिधा वितरण असे

तालुका वितरण (कंसात टक्के) शिल्लक संच

पारोळा २८७६९ (९९.८३) ४८

बोदवड १४४४१ (९८.६९) १९२

चाळीसगाव ५७३२६ (९८.१४) १०८८

धरणगाव २६९७५ (९८.०२) ५४५

भुसावळ ३७४८६ (९७.९१) ८०२

पाचोरा ४३७८१ (९७.५५) १०९९

एरंडोल २३५९८ (९७.४३) ६२३

मुक्ताईनगर २६२९९ (९७.१६) ७७०

रावेर ५०४३९ (९७.११) १५००

जामनेर ४५४०६ (९६.८४) १४८३

भडगाव २४६८५ (९६.७४) ८३२

यावल ३७८२० (९६.०३) १५६४

अमळनेर ४६५७६ (९५.१९) २३५५

चोपडा ४४५१२ (९५.०९) २२९६

जळगाव ७४९५५ (९४.९९) ३९५०

एकूण ५८३०६८ (९६.८२) १९१४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT