Secondary Education Officer Dr. Kiran Kunwar.
Secondary Education Officer Dr. Kiran Kunwar. esakal
जळगाव

Jalgaon News : विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास कारवाई : माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. कुंवर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : परीक्षा केंद्रावर दहापेक्षा अधिक विद्यार्थी एकावेळी कॉपी करताना आढळल्यास संबंधित केंद्र चालक, पर्यवेक्षकांवर प्रशासकीय कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांनी मंगळवारी (ता.१३) येथे दिला.

माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित मुख्याध्यापकांची सहविचार सभा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली. (Secondary Education Officer Dr. Kunwar statement Action if students are found copying jalgaon news)

त्यावेळी त्या बोलत होत्या. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बाबत मार्गदर्शन केले. उपक्रम पुढच्या वर्षीही चालू ठेवण्याबाबत सांगितले.

भाजप प्रदेश महिला उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनीही कॉपीमुक्तबाबत आवाहन केले. डॉ. राजेश पाटील यांनी अवयवदान संदर्भात मार्गदर्शन केले.

उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांनी कॉपीमुक्त अभियानाबाबत मार्गदर्शन केले. दीपाली पाटील यांनी गुणदान व गुणवत्ता वाढीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी जिल्ह्याचा निकाल कमी असल्याबाबत चिंतन व मार्गदर्शन केले.

शिक्षणाधिकारी म्हणाल्या की, कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबवावे. शालेय पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याची लवकरच पडताळणी होईल. त्यात सत्यता आढळल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.

एखाद्या शाळेतील लिपिक माध्यमिक विभागात जर आला तर, त्याच्याजवळ शिक्षणा मुख्याध्यापक यांचे पत्र असणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी एमएमएस व सर्व योजना बाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. शैलेश राणे यांनी केले.

सर्व संघटनांच्या वतीने राष्ट्रीयकृत बँकेत पगार झाल्याबद्दल आमदार तांबे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कुंवर यांचा सत्कार झाला. उपशिक्षणाधिकारी एफ. ए. पठाण, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक एजाज शेख आदींनी सहकार्य केले.

विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, एस. डी. भिरूड, एन. ओ. चौधरी, अरुण सपकाळे, प्रा. सुनील गरुड, संजय पाटील, डॉ. मिलिंद बागूल आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT