accident esakal
जळगाव

Jalgaon Accident News: पान खाण्यासाठी आले अन्‌ अपघात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : जळगाव- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पान टपरीवर पान खाण्यासाठी उभे असलेल्या आजोबांना जीप चालकाने धडक दिली. (senior citizen injured due to Jeep jeep driver hit Jalgaon Accident News)

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत जीप चालकाने पायावरून चाक नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

फैजपूर (ता.यावल) येथील रहिवासी मोतीराम यादव वारके (वय ७०) कामधंद्यासाठी जळगावी येतात. मंगळवारी (ता.२१) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते राष्ट्रीय महामार्गावर बुलेट शोरूम समोरील पान टपरीवर पान खाण्यासाठी आले होते.

पान खात असताना जळगाव कडून भुसावळच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या क्रूझर जीप (एमएच.२८अेएन२३२८) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून या आजोबांच्या उजव्या पायावरून गाडीचे चाक नेल्याने वाळके गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात क्रुझर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

Shocking News : घरात धार्मिक कार्य, पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी तरुणीने खाल्ल्या गोळ्या, दुर्देवी मृत्यू

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

SCROLL FOR NEXT