court sakal
जळगाव

National Peoples Court : लोक लोकन्यायालयात 449 वादपुर्व प्रकरणांचा निपटारा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय नुकतेच संपन्न झाले. (Settlement of 150 pending and 2 thousand 449 pre litigation cases in National Peoples Court jalgaon news)

त्यात 150 दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघून 1कोटी 23 लाख 61 हजार 271 रुपयांची तसेच 2 हजार 449 वादपूर्व प्रकरणांचा निपटा होऊन 95 लाख 84 हजार 816 रुपयांची वसुली झाली.

याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या जी. बी. औंधकर, सहदिवाणी न्या मंगला हिवराळे, पंच सदस्य अड. संजय देवगया, वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲड. मंगेश गायकवाड, सचिव ॲड. राजेंद्र पाटील तसेच जेष्ठ विधीज्ञ उपस्थित होते. भाऊबंदकी वाद असलेला 20 वर्षांपूर्वीचा जुना शेतीसंबंधी दिवाणी दावा निकाली काढण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यात ॲड.सी. एस. शर्मा व ॲड. पी. के. कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी न्यायाधीश जी. बी. औंधकर व न्या. हिवराळे यांच्या हस्ते उभयतांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रथमच यावेळी ई साक्ष नोंदवून 4 केसेस निकाली काढण्यात आल्या. यावेळी न्या जी. बी. औंधकर यांनी लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवा व लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

लोक न्यायालय यशस्वीतेसाठी वकील संघाचे पदाधिकारी ,सदश्य पंचायत समिती, ग्रामसेवक , बँक , दूरसंचार , पोलिस, तालुका विधी सेवा समिती व न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT