जळगाव : महापालिकेतील ७७८ कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ७) महासभेच्या अगोदर सर्व नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. महासभा सुरू होण्याअगोदर कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळ महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांची भेट घेत त्यांच्याकडे समस्या मांडल्या.
आमच्यावर अन्याय झाला असून, आपण महासभेत आवाज उठवावा, अशी मागणी केली. महासभा सुरू झाल्यानंतर नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणाले, की सातवा वेतन आयोग काही कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे, तर काही कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात दोन गट पडलेले आहेत.(Seventh Pay Commission Commissioner assured to take decision in 15 days Jalgaon News)
त्यामुळे याबाबत नेमके कारण काय आहे व तो त्यांना केव्हा लागू होईल याची माहिती द्यावी. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले, की मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र त्यातील अपर आयुक्त गोसावी यांची बदली झाल्यामुळे त्यात नवीन अधिकारी घेऊन समिती गठीत करून १५ दिवसांत त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
शासनाकडे पुन्हा अहवाल पाठविणार माहिती देताना मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितले, की महापालिकेतील ९४८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. ७७८ कर्मचाऱ्यांच्या लेखापरीक्षणात आक्षेप असल्याने त्यांना तो लागू करण्यात आलेला नाही. यात १७७ कर्मचारी शैक्षणिक अपात्र, २३४ कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र, ४४ कर्मचारी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, तर ३४९ कर्मचाऱ्यांवर किरकोळ आक्षेप आहेत. याबाबत शासनाकडे पुन्हा अहवाल पाठविणार आहोत. त्यासाठी आम्ही काही कर्मचाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे आल्यानंतर आम्ही ती माहिती वरिष्ठ स्तरावर पाठविणार आहोत .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.