जळगाव

Jalgaon Crime: वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थिनीचा विनयभंग; शिवाजीनगरातील रिक्षाचालकास अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विस्तारीत शिवाजीनगर परिसरात पदव्युत्तर वैद्यकशास्त्राची विद्यार्थिनी डॉक्टर कार्यरत आहेत. परप्रांतातील असल्याने नातेवाईक नसल्याचा गैरफायदा घेत एका रिक्षाचालकाची या विद्यार्थिनीवर वाईट नजर पडली. (Sexual harassment of a female student by rickshaw driver jalgaon crime news)

गेल्या चार-पाच महिन्यांपासून हा भामटा त्या महिलेचा पिच्छा पुरवत होता. मात्र, आता मर्यादा ओलांडल्याने पीडितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. परप्रांतीय महिला डॉक्टरला एकटी पाहून गेल्या काही महिन्यापासून रईस जफर खान (वय २९, रा. शिवाजीनगर) हा रिक्षाचालक पाळत ठेवून होता.

सलग पिच्‍छा पुरवणे वांरवार समोरच राहणे या सोबतच पाठलाग सुरु होता. मात्र, तरी या महिला डॉक्टरांकडून दुर्लक्ष केले जात होते. असे असतांना रिक्षाचालकाची हिंमतच वाढली.

त्याने या महिला डॉक्टरचे फोटेसेशन करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. हा सर्व किळवासवाणा प्रकार लक्षात आल्यान त्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिल्यावरुन रईस नावाच्या (रा. शिवाजीनगर) रिक्षाचालका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी वर्णनावरुन या रईस नावाच्या भामट्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु होती. तपास महिला पोलिस अश्विनी इंगळे या करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT