The camels taken for slaughter are brought to Ahimsatirtha Goshala, where they are being served.  esakal
जळगाव

Jalgaon News: गाय, वासरासह आता अहिंसातीर्थात उंटांची सेवा; कत्तलीसाठी जाणाऱ्या 13 उंटांना आश्रय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: कत्तलीसाठी निर्दयीपणे वाहतूक करून नेत असलेल्या १३ उंटांची सावदा पोलिसांनी कारवाईदरम्यान सुटका केली. या उंटांना अहिंसा गोशाळेत आणले असून, त्याठिकाणी त्यांची सेवा सुरू आहे. (Shelter for 13 camels going for slaughter jalgaon news)

६ डिसेंबरला सायंकाळी सावदा पोलिसांनी केलेल्या कारवाईत हतनूर पुलाजवळ कत्तलीसाठी जाणाऱ्या १३ उंटांना ताब्यात घेतले. या उंटांना आयशर गाडीतून (सीजी १२ बीएच ३२८१) अक्षरशः कोंबून वाहतूक केली जात होती.

निर्दयीपणे त्यांना वाहनातून नेण्यात येत होते. जमा केलेले सर्व १३ उंट सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी अहिंसातीर्थ, रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्र, कुसुंबा येथे दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

जुनमध्ये वरणगाव पोलिसांनी अशाच पद्धतीने कत्तलीसाठी जाणाऱ्या ११ उंटांची सुटका करून त्यांना अहिंसातीर्थात पाठविले होते. त्यातील गंभीर दुखापत झालेले चार उंट मृत्युमुखी पडले असून उर्वरित सात व आता आश्रयास आलेले १३ अशा २० उंटांची गोशाळेत काळजीपूर्वक सेवा केली जात आहे.

आता उंटांची सेवा

गोशाळेत गाय किंवा गोवंश यांसह म्हशी, रेडे व उंट अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांची सेवा केली जाते. प्रत्येक पशु प्राण्यांचा जीव महत्त्वाचा, त्यांना अभयदान देणे हेच अहिंसेचे, पुण्याचे काम समजून या संस्थेचे काम सुरू असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Chh. Sambhaji Nagar News : फुलंब्री निवडणुकीत जादूटोण्यामुळेच निवडणुकीत पराभव; शिवसेना उमेदवाराचा गंभीर आरोप!

Alandi Election : आळंदी नगरपरिषदेतील गटनेता, उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्य निवडीसाठी चर्चासत्र सुरु!

SCROLL FOR NEXT