Crowd of devotees gathered at shiv maha puran katha  esakal
जळगाव

Shiv Maha Puran Katha: सून- मुलाने वागवले नाही, तरी आई माफ करते : पंडित प्रदीप मिश्रा

सकाळ वृत्तसेवा

Shiv Maha Puran Katha : शहरालगत सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेनिमित्त पंडित प्रदीप मिश्रा यांनी रविवारी (ता. १०) आईचे महत्त्व स्पष्ट केले. सून- मुलाने वागवले नाही, तरी आईचे हृदय इतके मोठे असते की त्यांना माफ करून मुलीला नाही तर मुलालाच सर्व मालमत्ता देऊन टाकते.. त्यामुळे आईच्या मनाला दुखावू नका, असे आवाहन पंडित मिश्रा यांनी केले.

एका मुलाच्या आपण प्राण्यांना कथा का सांगत नाहीत? या प्रश्‍नाचा दाखला देत ते म्हणाले, की प्राण्यांना काही सांगावे लागत नाही. मालकाने जे सांगितले ते सदैव ऐकतात. मनुष्याला मात्र सांगूनही समजत नाही, तो ऐकत नाही म्हणून त्यांच्यासाठी कथा आहे. (Shiv Mahapuran Katha pandit pradeep mishra guidance jalgaon news)

जळगावकरांना ‘धन्य’

रविवारी सहाव्या दिवशी कथा निरुपणात श्री. मिश्रा म्हणाले, की कथा मंडपात रात्रीचा भक्तांचा उत्साह चैतन्यदायी आहे. एवढ्या गर्दीतही नागरिक, संस्था भक्तांची सेवा करीत आहेत. दिवस-रात्र नाश्‍ता, चहापान, भोजन आदी व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत दिल्ली- नोएडात झालेल्या सभेतच सेवेकरांनी मोठ्या प्रमाणात भोजन सेवा दिल्याचे आपले मत होते. पण जळगावातील नागरिकांनी ते मत बदलण्यास भाग पाडले. रात्रीचा दिवस करणारे जळगावकर खरेच ‘धन्य’ आहेत.

सुनांमध्ये फरक करू नका

मिश्रा म्हणाले, की एकाच घरात दोन सुना असतील, तर त्यात सासूने कोणताही फरक करू नये. ही चांगली, ती वाईट.. ही चांगले भोजन बनविते, दुसरीला जमत नाही, असे बोलू नये. त्यामुळे सुनांच्या मनात आपल्याप्रति आदर कमी होतो. सर्व सुनांना सारखी वागणूक द्यावी.

भक्ती करा विश्‍वासाने

लाखो भाविक कोणत्याही अपेक्षेशिवाय या कथास्थळी आले आहेत. या भक्तांची सेवा करणारे हजारो हात नि:स्वार्थ सेवा करीत आहेत. कारण या सर्व भक्तांना भगवान महादेवाबद्दल श्रद्धा आहे. सलग सहा-सात दिवस थंडीत राहून महादेवाची भक्ती केली जात आहे. प्रत्येक भक्ताने अशीच श्रद्धेने भक्ती केली, तर त्याला निश्‍चितच फलप्राप्ती मिळते.

या वेळी मिश्रा यांनी विविध ठिकाणच्या भक्तांची पत्रे, तसेच त्यांच्य अनुभवांचे कथन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, माजी महापौर सीमा भोळे आदी उपस्थित होते.

विक्रमादित्याला कसे मिळाले सिंहासन?

पंडितजींनी राजा विक्रमादित्य व इंद्राची गोष्ट सांगितली. विक्रमादित्यास इंद्राने सभेत बोलावले. ‘इंद्राने का बोलावले असेल’ असा राजाला प्रश्‍न पडला. इंद्राने त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यानुसार त्याच्या सभेतील रंभा व उर्वशी यांच्यापैकी श्रेष्ठ नर्तिक कोण? हे ठरविण्यास विक्रमादित्यास सांगितले. विक्रमादित्याने महादेवास स्मरण करत दोघांची परीक्षा घेण्याचे ठरविले. महादेवाच्या सूचनेनुसार त्या दोघींना पुष्पगुच्छ देऊन नृत्य करण्यास सांगितले.

दोन्ही पुष्पगुच्छांत महादेवाने विंचू सोडले होते. नृत्यास सुरवात करताच रंभाला विंचू चावला व तिने पुष्पगुच्छ फेकत नृत्य थांबवले. मात्र, उर्वशी नृत्य करीतच राहिली. विक्रमादित्याने उर्वशीच्या नृत्यात विंचूही रममाण झाला, म्हणून तिला चावला नाही, असे सांगत उर्वशी श्रेष्ठ असल्याचे जाहीर केले. नंतर महादेवांनी प्रगट होऊन इंद्राला त्याचे ३२ पऱ्यांचे सिंहासन विक्रमादित्यास देण्यास सांगितले. त्यानंतर राजा विक्रमादित्य त्या सिंहासनावर बसून निर्णय देत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT