sant Bahina Bai ram rath esakal
जळगाव

Shriram Rathotsav : बहिणाबाईंच्या नजरेतून...श्रीराम रथोत्सव

सकाळ वृत्तसेवा

Shriram Rathotsav : खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरींनी जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवाबद्दल हे वर्णन आपल्या ओव्यांमधून करून ठेवलंय...रथोत्सवांचा जिल्हा म्हणून जळगावची साऱ्या महाराष्ट्रात ओळख आहे.

केवळ जळगाव शहरच नव्हे, तर जिल्हाभरात विविध ठिकाणी भव्य आणि शतकी परंपरा लाभलेले रथोत्सव साजरे केले जातात. (shriram rathotsav poem by bahinabai chaudhari jalgaon news)

जळगावमधील श्रीराम मंदिर संस्थानचा हा दीडशतकी परंपरा लाभलेला उत्सव जळगावचे वैभव आहे...त्याकडे आध्यात्मिक उत्सव म्हणून न पाहता, सांस्कृतिक अधिष्ठान असलेला, सर्व जाती- धर्मातील समाज घटकांना एकत्रित करणारा उत्सव म्हणून तो अख्ख्या खानदेशात लौकिक प्राप्त झालाय....

उत्साह, चैतन्य, सेवा, नियोजन आणि समर्पण या सर्व गोष्टींचा मिलाप या उत्सवातून दिसून येतो. त्यातून निर्माण होते सकारात्मक ऊर्जा...काळाच्या ओघात रथोत्सवाचे स्वरूप बदलले, तरी त्याचे महत्त्व, उत्सवातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे...दहा दिवस चालणारा वहनोत्सव आणि त्यानंतर कार्तिक एकादशीला (प्रबोधिनी एकादशी) गुरुवारी (ता. २३) निघणारा श्रीराम रथोत्सव म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापनाचा आदर्श धडा म्हणावा लागेल...हे नियोजन, त्यासाठी राबणारे हजारो हात, सर्व समाज घटकांचे योगदान, उत्सवाची वैशिष्ट्य़े या सर्वच गोष्टींचा आढावा घेणारा हा विस्तृत वृत्तांत...

श्रीराम रथोत्सव : बहिणाबाईंच्या नजरेतून...

दरसाल दहा दिसा, येतो उत्सवाले भर।

वहनावरे बशीसनी, येती दहा अवतार॥

दाही सरता वहन, आली एकादशी मोठी।

मंग सवारला रथ, झाली गावांमधी दाटी॥

चार फोडले नारय, अरे चारी चाकावरी।

सर्व्या मयातील फुल, चढविले रथावरी॥

रस्त्यावर शिंपडल्या, लाखो पाण्याच्या घागरी।

रथ चाले धडा धडा, लागे चाकाले मोगरी॥

सर्व्या बाजाराची केयी, माझ्या रथाची वानगी।

घरोघरी ऐपतीने, मिळे पैशाची कानगी॥

लोक आले दर्शनाले, लोक झुंड्यावर झुंड्या।

रथापुढती चालल्या, किती भजनाच्या दिंड्या॥

ज्यांनी केली कार्तिकीले, जयगावची पंढरी।

अप्पामहाराज गेले, गेले कसे म्हनु तरी॥

- कवयित्री बहिणाबाई चौधरी

बहिणाबाईंच्या या कवितेतून रथोत्सवाचा संपूर्ण महिमा वर्णिला आहे. दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून रथोत्सवाच्या प्रारंभी वहनोत्सव सुरू होतो. विविध दहा वहनांच्या अवताराचा उल्लेख त्या पहिल्या ओव्यांमध्ये करतात. रथाच्या चाकावर नारळ वाढवणे, त्याचे पूजन, फुलांची सजावट, रस्त्यावर सडा- रांगोळ्यांनी रथाचे स्वागत, रथाचे चालणे, थांबवण्यासाठी चाकाला मोगरी लावणे याचेही यथार्थ वर्णन या काव्यात आहे.

भाविकांकडून केळीचा नैवेद्य, ऐपतीनुसार दिलेली देणगी, हजारोंच्या संख्येने होणारी भक्तांची गर्दी, रथापुढे चालणाऱ्या भजनाच्या दिंड्या कवितेत आहेत. ज्यांनी १५१ वर्षांपूर्वी रथोत्सवाची ही परंपरा सुरू करून जळगावची ‘पंढरी’ केली, त्या संत अप्पा महाराजांना वंदन करून बहिणाबाई या कवितेचा समारोप करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT