Sriram Shidhaye presenting his thoughts at the symposium of the All India Literature Conference. esakal
जळगाव

Amalner Marathi Sahitya Sammelan : जीवनमूल्यांचे प्रतिबिंब साहित्यात गरजेचे : श्रीराम शिधये

प्रत्येकाने जीवनमूल्य सांभाळली पाहिजेत अन ती सांभाळून त्यांचे प्रतिबिंब साहित्यात उतरविले पाहिजे.

उमेश काटे

Amalner Sahitya Sammelan : प्रत्येकाने जीवनमूल्य सांभाळली पाहिजेत अन ती सांभाळून त्यांचे प्रतिबिंब साहित्यात उतरविले पाहिजे. जीवनाच्या अनेक विविधांगी व्याख्या केल्या जातात, मात्र जीवन हे जीवनासारखे आहे, हे पण लक्षात घेतले पाहिजे. बदलत्या जीवनासारखे आहे का? हे पण शोधले पाहिजे.

माणूस जगणे हेच एक मूल्य आहे. त्याचे जीवन दर्शन होते पण बऱ्याचवेळा मूल्य दर्शन होत नाही. आजची मूल्य ही उद्याची मूल्य राहणार नाहीत. आजच्या साहित्यातून जीवनमूल्य दिसून येतात, असे प्रतिपादन श्रीराम शिधये (डोंबिवली) यांनी केले. (Shriram Shidhaye statement in amalner sahitya sammelan Reflection of life values ​​is necessary in literature jalgaon news)

खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठाच्या सभा मंडपात दुसऱ्या सत्रात ‘आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्य हरवत चालली आहेत का?’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रशांत पोळ (जबलपूर) हे अध्यक्षस्थानी होते.

या परिसंवादात डॉ. पी विठ्ठल (नांदेड) यांनीही सहभाग घेतला. डॉ. विठ्ठल यांनी सांगितले की, आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्य हरवत चालली आहेत का, हा प्रश्न निर्माण करण्यापूर्वी एक लक्षात येते की, यापूर्वी साहित्यात जीवनमूल्ये होती.

म्हणूनच ती हरवत चालली आहेत. अलीकडे रामराज्य यावे याची चर्चा होत आहे, मात्र रामातील असलेले नैतिक गुण व सत्य वचनी मूल्य ही प्रतिबिंबित झाली पाहिजेत. राज्यकर्त्यांनी याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. संत परंपरेने मूल्यांना नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे.

साहित्यात सामाजिक व सांस्कृतिक संस्कृती दिसून येते. लेखक ज्या समाज घटकातून जन्म घेतो त्याचे संस्कार त्याच्या साहित्यात दिसून येतात.

मूल्य व्यवस्था जशीच्या तशी स्वीकारता येत नाही, तर त्या मूल्यांची चिकित्सा करणे गरजेचे आहे. प्रशांत पोळ यांनी सांगितले की, जीवनमूल्ये ही साहित्यात प्रतिबिंबित होतात.

त्याचे सकारात्मक उदात्तीकरण झाले पाहिजे. कसदार वैचारिक लेखन होत आहे, ते टिकवता आले पाहिजे. संदीप खरे यांच्या ‘दमलेल्या बापाची कहाणी’ या कवितेत बापाचे मुली प्रति असलेले प्रेम हे मूल्य दिसून येते. ऐकणारा प्रत्येक जण हुंदके देतो.

सद्यस्थितीमध्ये ऐतिहासिक कादंबरी मोठ्या प्रमाणात लिहिल्या जात आहेत, त्यांचा खप पण बऱ्यापैकी होत आहे. म्हणूनच शिवरायांच्या शूरवीर असलेल्या मावळ्यांवर कादंबऱ्या प्रकाशित होत आहेत.

डॉ. किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन केले. मराठी वाङ्‌मय मंडळ व खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT