खून sakal
जळगाव

जामनेर : शुभम माळीचा अपघात नव्हे खूनच; संशयित बोदवडचा

संशयित बोदवडचा; मृत्यू प्रकरणाचा १४ दिवसांत लावला छडा

सकाळ वृत्तसेवा

जामनेर : शहरातील बोदवड रस्त्यावरील कांग नदीच्या पुलाखाली ३१ जानेवारीला बोदवड शहरातील दत्त कॉलनीमधील रहिवासी शुभम नंदू माळी (वय २३) याचा मृतदेह व दुचाकी आढळून आली होती. आपल्या मुलाचा मृत्यू अपघात नसून घात झाला असल्याचा संशय मृताच्या आईने यावेळीच व्यक्त केला होता. जामनेर पोलिस स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यांनी केवळ चौदा दिवसांत घटनेचा छडा लावून बोदवड येथीलच रहिवासी पवन अशोक माळी या संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली.

मृत शुभम हा पहूर येथे चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. ३१ जानेवारीला आपले काम आटपून तो आपल्या दुचाकीने पहूर येथून बोदवडकडे जाण्यासाठी निघाला होता. या दरम्यान जामनेर शहरातील बोदवड रोडवरील कांग नदीच्या पुलाखाली त्याचा मृतदेह व दुचाकी आढळून आली होती. या वेळी मारेकऱ्यांकडून शुभमचा अपघात झाल्याचा बनाव निर्माण करण्यात आला होता.

परंतु गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने तपासचक्रे फिरवित अवघ्या चौदा दिवसांतच या घटनेचा उलगडा करून संशयित पवनला अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने पैशाच्या देवाण घेवाण करण्यामधूनच शुभमचा खून करण्यात आल्याची कबुली दिली. मृत शुभमची आई प्रमिला नंदू माळी यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १३) संशयित पवन अशोक माळी (रा. बोदवड) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul dairy election politics : पुढच्या ३ महिन्यात गोकुळ दूध संघासाठी होणार मतदान, लवकरच वातावरण तापणार

प्राइम व्हिडिओ भारतीय प्रेक्षकांसाठी नव्या वेबसिरीज आणि सिनेमे ; जाहीर केली अधिकृत यादी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण

Small Savings Update: बँक FD पेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिस स्कीम्सवर मोठा अपडेट; आता किती व्याज मिळणार?

Chhatrapati Sambhajinagar: तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न; पंचनामा करताना प्रकार; सिल्लोडमध्ये वाळू माफियांची वाढली मुजोरी

SCROLL FOR NEXT