Silver And Gold Rate fall in price of four thousand silver 1 thousand in gold jalgaon  sakal
जळगाव

Silver And Gold Rate : चांदीत साडेचार हजारांची घसरण; सोन्यातही १ हजारांने खाली

सोने, चांदीच्या दरात अचानक घट झाल्याने गुंतवणूकदारांना चांगली संधी उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येत्या गुरूवारी (ता. २५) गुरुपुष्यामृत योग आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २२) सोने, चांदीच्या दरात अचानक घट झाल्याने गुंतवणूकदारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या सात दिवसात सोन्याच्या दरात एक हजारांची घट तर चांदीच्या दरात तब्बल साडेचार हजारांची घट झाली आहे. सध्या लग्नसराई, बारसे यासारखे व इतरही कार्यक्रम नाही. सोने-चांदीच्या दरात महिन्यापूर्वी चांदी ५६ हजारांपर्यंत खाली घसरली होती. यामुळे गुंतवणुकदारांनी सोने, चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. नंतर दर पुन्हा वाढून चांदी प्रतिकिलो ६१ हजारांपर्यंत गेली होती. सोन्याचे दरही तेजीत होते. आता मात्र मागणी नसल्याने, सोबतच गुरुपुष्यामृत योग अवघ्या तीन दिवसांवर आल्याने चांदीच्या दरात किलोमागे साडेचार हजारांची घट झाली आहे. सोन्याचे दर १५ ऑगस्टला ५३ हजारापर्यंत गेले होते. ते सध्या ५२ हजार रुपये तोळ्याप्रमाणे उपलब्ध आहे.

सोने, चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होतो. यामुळे दरात चढउतार होतात. आजचे दर हे आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे कमी झाले असावेत. गुंतवणूकदारांना ही चांगली संधी आहे.

- मनोहर पाटील, व्यवस्थापक आर.सी.बाफना ज्वेलर्स.

सात दिवसात सोन्याचा दर

तारीख सोने (प्रतितोळे) चांदी (प्रतिकिलो)

१६ जून ५१ हजार २०० ६४ हजार

२१ जून ५१ हजार ३०० ६३ हजार ५००

२२ जून ५१ हजार ६२ हजार ५००

१५ ऑगस्ट ५३ हजार ६१ हजार

१६ ऑगस्ट ५२ हजार ५०० ६० हजार

२२ ऑगस्ट ५२ हजार ५६ हजार ५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT