ST Bus sakal
जळगाव

जळगाव विभागातून आतापर्यंत ३३२ कर्मचारी निलंबित

एसटी कर्मचारी संप : तीन आगारांतून बससेवा सुरू; ४१७ कर्मचारी रुजू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांचा गेल्‍या महिनाभरापासून संप सुरू आहे. विलीनीकरण याच मागणीवर कर्मचारी ठाम आहेत; परंतु राज्‍य शासन व प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. यात जळगाव विभागातून आतापर्यंत ३३२ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे कारवाईच्‍या भीतीने चारशेहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून संप सुरू आहे. संपावर तोडगा म्‍हणून सरकारने पगारवाढीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय मान्‍य नसल्‍याचे सांगत कर्मचारी संपावर ठाम राहिले. यामुळे शासनाच्या आदेशानुसार संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात येत आहे. यात कामावर रुजू होत नसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच बदलीची कारवाई केली.

पुन्‍हा ५१ कर्मचाऱ्यांचे निलंबन

जळगाव जिल्ह्यात आजदेखील कारवाई केली असून, मंगळवारी ५१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या एकूण २८१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, आतापर्यंत ३३२ कर्मचारी निलंबित केले आहेत.

तीन आगारांतून बससेवा सुरू

जळगाव जिल्ह्यात एकूण कार्यरत चार हजार ४४२ कर्मचारी संपावर आहेत. निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने काही कर्मचारी सेवेत रुजू झाले. जळगाव जिल्‍ह्यातील ४१७ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. यात २८ चालक व २१ वाहकांचा समावेश आहे. या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भुसावळ, अमळनेर व जळगाव आगारातून बससेवा सुरू केली आहे. यामुळे चोपडा, जामनेर, पाचोरा व धुळे मार्गावर बस सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT