Scenes from the play 'Uncle Vanya' performed at the State Drama Competition on Thursday. esakal
जळगाव

Rajya Natya Spardha 2023 : विस्कटलेल्या प्रेमाची वीण : अंकल वान्या

सकाळ वृत्तसेवा

Rajya Natya Spardha 2023 : मिलता तो बहुत कुछ है इस जिंदगी में

बस हम गिनती उसी की करते है

जो हासिल ना हो सका..

आयुष्य जगताना प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या गोष्टीमागे धावतच असतो. मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, ह्याच गणितात तो फसलेला असतो. (Spoiled Love Mate Uncle Vanya drama of rajya natya spardha 2023 jalgaon news)

ते अंतिम श्‍वासापर्यंत जे नाही मिळालं त्याचंच त्याला दुःख असतं. मला हे नाही मिळालं वगैरे, वगैरे पण जे काही न मागता मिळालं त्याची तो गणती, मोजमापच करीत नाही आणि व्यर्थ निराशा पदरी पाडून घेतो.

मूलतः विनोदाची किनार असणारं रशियन नाटककार अँटोन चेखॉव्ह लिखित ‘अंकल वान्या’ हे नाटक सोनल चौधरी यांनी रूपांतरित व दिग्दर्शित करून जननायक थिएटर्सने सादर केले. निमित्त होते, राज्य नाट्य स्पर्धेचे.

रशियन कथाकार, नाटककार अँटोन चेखॉव्ह यांचे हे आव्हानात्मक नाटक. जीवनाच्या क्षुद्रतेमुळे येणारा कंटाळवाणेपणा हे त्यांच्या अनेक कथांचे सूत्र असते. सर्वसामान्यांच्या जीवनातील बाह्यतः साध्या वाटणाऱ्या घटनांच्या चित्रणातून परिणामकारक कथा अथवा नाट्य उभे करण्याचे सामर्थ्य चेकॉव्ह यांच्या ठायी होते.

त्यांनी लिहिलेले ‘अंकल वान्या' हे नाटक १८९७ मध्ये प्रकाशित झाले होते, तर कॉन्स्टँटिन स्टॅनिस्लावस्की यांच्या दिग्दर्शनाखाली १८९९ ला याचा प्रयोग मॉस्को आर्ट थिएटरच्या निर्मितीत झाला होता.

जीवनात केलेल्या चुकांचा पश्चाताप, बलिदान, अयशस्वी प्रेम या त्रिसूत्रीत बांधलेले ‘अंकल वान्या' या नाटकाचे कथानक. आपल्या बहिणीच्या नवऱ्याची प्रोफेसर अलेक्झांडर यांची इस्टेट सांभाळणारा इवान वाचोस्की (वान्या) हा त्याची भाची सोनिया, ममी, नॅनी मारिना यांच्यासोबत जगत असतो.

अचानक प्रोफेसर आपल्या दुसऱ्या तरुण पत्नी हेलेनासह इस्टेटवर राहायला येतो. वान्या हेलेनाच्या प्रेमात पडतो, मात्र हेलनाचे प्रेम गावातील डॉ. ॲस्ट्रॉफ वर असते. त्याचबरोबर डॉ.ॲस्ट्रॉफ वर वान्याची भाची सोनियाचा जीव जडलेला असतो. हेलेना प्रेमाची कबुली देते. मात्र ती प्रोफेसर अलेक्झांडर यांच्याशी एकनिष्ठ राहते.

अचानक प्रोफेसर इस्टेट विकण्याचा प्रस्ताव ठेवतो. आपण वर्षानुवर्षे इस्टेट सांभाळण्यासाठी केलेल्या बलिदानाचे हेच फलित मिळाल्याने, वान्या अस्वस्थ असतो आणि यातूनच तो प्रोफेसरवर गोळ्या झाडतो पण त्यातही अयशस्वी ठरतो.

नाट्यातील जवळजवळ प्रत्येक पात्र त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल असमाधानी आहे. वान्या आणि सोनिया नाखूष आहेत. कारण ते इस्टेटवर काम करण्यात आणि त्यांचे सर्व पैसे प्रोफेसरला पाठवण्यात घालवतात. म्हातारपण आल्यावर प्रोफेसर दु:खी आहेत आणि त्यांना त्यांची शिष्यवृत्ती अपूर्ण वाटत आहे.

डॉ. अॅस्ट्रोफ हेलेनाच्या नकारात अडकलेले आहेत, तर ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी हेलेनाने आलेल्या संधीला नकार नकार दिला असला तरी, वयाने मोठ्या माणसाशी लग्न केल्याचा हेलेनाला पश्‍चाताप होतो आहे. परिवारासाठी वान्याने दिलेले जीवनाचे बलिदान ही नाटकाचे मुख्य प्रेरक शक्ती आहे.

मूळ लेखकाने लिहिलेल्या शब्दाबरहुकूम सोनल चौधरी त्याचे रूपांतरण व दिग्दर्शन व वान्याच्या भूमिकेत यशस्वी ठरतात. फक्त स्वतः व हेलेना (प्रतीक्षा झांबरे) यांचा अपवाद वगळता इतर कलावंतांच्या वाचिक अभिनयावर मेहनत घेणे गरजेचे होते.

वान्या व हेलेना यांच्या समर्थ अभिनयाला साथ लाभली, ती सोनिया (भाग्यश्री अमृतकर), डॉ. ॲस्ट्रॉफ (श्रीकांत पाटील), प्रोफेसर सेरेब्रेकोफ (शीतल जोशी), मरिना (कांचन अटाळे), ममी (गायत्री सोनार), वैफल्स (सतीश सुर्वे) यांची.

तांत्रिक बाजूत नेपथ्य रशियन बनावटीचे भव्य घर उभे करणारे व नाट्यास पूरक असे, तर नाट्यास प्रभावी करण्यात तेवढीच महत्त्वाची भूमिका लोकेश भांडारकर व ईश्वर पाटील यांच्या प्रकाशयोजनेची. सोनाली चौधरी यांची रंगभूषा व मयुरा धुमक यांची वेशभूषा प्रत्येक पात्रास साजेशी अपवाद. फक्त वान्याने वापरलेला सूट नाट्यकाळाशी सुसंगत वाटत नव्हता.

शुभम चौधरी यांचे पार्श्वसंगीत प्रवाही. कलावंतांचा अभिनय, तांत्रिक बाजूंची त्यांना योग्य साथ यामुळे पहिल्या अंकात प्रयोग रंगला, तर दुसऱ्या अंकात मात्र काहीसा संथ झाला. एक आव्हानात्मक नाट्य सादर करून रसिक प्रेक्षकांना नाट्यानंद दिल्याबद्दल जळगावच्या जननायक थिएटर्सच्या सर्व कलावंत व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google CEO सुंदर पिचाईंनी दिलं सरप्राइज, 3 केळींच्या इमोजीने लॉन्च झालं Nano Banana, हे नेमकं आहे तरी काय?

Solapur News: साेलापूर नगरपरिषदेसाठी मंगळवेढ्यातून २०, बार्शीतून ८ हरकती; नगराध्यक्षांच्या आरक्षणाचा घेतला जातोय कानोसा

Child Eye Protection: मिरवणुकीत बालकांसोबत जाणार आहात? सावधान! लेझर किरणांचा डोळ्यांवर होऊ शकतो गंभीर परिणाम

Narendra Modi : फिजीचे पंतप्रधान राबुका यांचे मोदींना सूचक सल्ला; 'कोणीतरी नाखूश, पण तुम्ही मात करू शकता'

Former Sarpanch Accident : मॉर्निंग वॉक करताना माजी सरपंचांना चाकरमान्यांच्या मोटारीने ठोकले, कऱ्हाड -रत्नागिरी मार्गावर घटना

SCROLL FOR NEXT