14 people were bitten by stray dog ​​in kharajai jalgaon news esakal
जळगाव

Stray Dog Sterilization : शहरात 15 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण; मोकाट कुत्र्यांचा त्रास सुरूच

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. दोन वर्षात पंधरा हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. (Sterilization of 15 thousand dogs in city jalgaon news)

सर्वेक्षणानुसार अद्यापही ४५ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिकेने यासाठी एक कोटी चाळीस लाख रूपये मक्तेदाराला मोजले आहेत.

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे जनतेला त्रास होत आहे. अनेक भागात कुत्री घोळक्याने रस्त्यावर बसून असतात. वाहनधाराकांच्या ते मागे लागतात. यामुळे अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत. या मोकाट कुत्र्यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार महापालिकेने मुंबई येथील कंपनीला निर्बीजीकरणाचा मक्ता दिला आहे. कुत्र्याला पकडून त्याचे निर्बीजीकरण करून त्याला पुन्हा त्याच जागेवर सोडून देण्यात येते. याअंतर्गत प्रतिकुत्रा ८३८ रूपये या मक्तेदाराला अदा करण्यात येत आहेत. दोन वर्षात तब्बल पंधरा हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाच-सहा वर्षे लागतील

महापालिकेतर्फे शहरातील कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. शंभर माणसांच्या तुलनेत तब्बल आठ कुत्रे, असा निकष लावण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या सहा लाख असल्याचे गृहीत धरल्यास एकूण साठ हजार मोकाट कुत्रे शहरात आहेत. त्यापैकी केवळ अठरा हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले असून, अद्याप तब्बल ४५ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण बाकी आहे.

एका वर्षात साधरणत: नऊ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण असे समीकरण धरल्यास संपूर्ण निर्बीजीकरणास आणखी पाच ते सहा वर्षे लागण्याची शक्यता आहे.

मात्र, अद्यापही शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास सुरूच आहे. त्यामुळे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या मोकाट कुत्र्यापासून सुटका होण्याची नागरिकांना अद्यापही प्रतिक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT