bike thieves arrested esakal
जळगाव

चोरीच्या वाहनांची कवडीमोल विक्री; टोळीतील तिघांना अटक

रईस शेख

जळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यातून दुचाकींची चोरी (Bike theft) करून कवडीमोल भावात विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे. (stolen vehicles Three members of gang were arrested Jalgaon crime news)

दुचाकी चोरींच्या गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शाखेला केल्या होत्या. त्यानुसार यावल तालुक्यातील अंजाळे येथील दोन तरुण हे दुचाकी चोरी करून विक्री करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांच्या पथकातील अंमलदार दीपक पाटील, महेश महाजन, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, अशोक पाटील यांच्या पथकाने माहितीचा पाठपुरावा करत अंजाळे गाठले.

अंजाळे येथून तुषार संतोष सपकाळे (वय २२), तेजस विकास सपकाळे (वय २०, दोघे रा. अंजाळा, ता. यावल) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी फैजपूरच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वाहने हस्तगत करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार व राहुल श्‍याम मोरे (वय २०, रा. हनुमंतखेडाल, ता. एरंडोल) याचे नाव पुढे आल्याने त्यालाही लागलीच ताब्यात घेण्यात आले. अटकेतील तिघांना अधिक तपासासाठी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT