Latest Marathi News
Latest Marathi News  esakal
जळगाव

रेल्वेलाइनवर अंधारलेल्या गरिबीचा संघर्ष; वास्तवाने अंतर्मन स्तब्ध

राजेंद्र पाटील

नांद्रा (ता. पाचोरा) : मध्य रेल्वेच्या तिसऱ्या रेल्वेलाईनचे काम माहेजी रेल्वेस्थानकावर सुरू आहे. माहेजी ते परधाडे दरम्यान सुरू असलेल्या मध्य रेल्वेच्या कामावर पोटाची खळगी भरण्यासाठी खडीवर बाळाला झोपवून आपले कर्तव्य पार पाडतानाचा वास्तववादी संघर्ष पाहून कोणाचेही अंतर्मन स्तब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. या तिसऱ्या रेल्वेलाईनच्या कामावर विविध ठिकाणचे राज्याबाहेरील कुशल अकुशल कामगार काम करत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी अकुशल कामगार बरीच आहेत व त्यात बरीच दाम्पत्य कामावर नजरेस पडतात. (Latest Marathi News)

माहेजी रेल्वेस्थानकावर येथील एका साईटवर मध्य प्रदेशातील मजूर या तिसऱ्या लाईनच्या कामासाठी आले आहेत. ते येथील रेल्वे लाईनच्या जवळच राहत असून, ठेकेदाराकडे कामाला आहेत. यापैकी एका दाम्पत्याने आपल्या सहा महिन्याच्या मुलाला रस्त्यावरच जेथे काम चालू आहे तेथेच झोपवून आपले लक्ष राहिल एवढ्या अंतरावर खाली गोणपाट टाकत जुजबी गोधडी टाकत त्यावर झोपवलेले निदर्शनास आले.

देशाच्या उद्याच्या भविष्यामधील हे अंतर कधी कमी होणार...?

पोटाची खळगी भरण्यासाठी व काम मिळेल तर खायला मिळेल. त्यासाठी येथे मिळेल ते काम करणे एवढंच भांडवल असल्याने या जोडप्याने आपल्या पोटच्या गोळ्याला काम करत असताना जणू काही विधात्याकडेच स्वाधीन केलेले असावे, अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या बाळाची आई अधूनमधून वेळ साधत त्यास गोंजारत असल्याचे पाहिल्यावर खऱ्या अर्थाने ममत्वाचा गारवा व कामातील कठोरता या यामधील अंतर दिवसातून ही माऊली किती वेळा कापत असेल, हे सांगणे कठीण आहे. रेल्वेतून ए.सी.स्लीपर क्लासमधून प्रवासात जाणारे हे लहानगे बाळ बघितल्यावर देशाच्या उद्याच्या भविष्यामधील हे अंतर कधी कमी होणार, हा यक्षप्रश्नच म्हणावा लागेल.

एकीकडे समाजातील काही विकृतींचा यथेच्छ चंगळवाद व पोटासाठी हजारो मैल अंतर पार करून आलेल्या या श्रमिकांच्या जीवन संघर्षाकडे पाहिल्यास मनाची काहिली झाल्याशिवाय राहत नाही.एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, शासन नारा देत गरिबी हटाव, पण ती घोषणाच राहते. या स्वरूपाची ही रक्ताचं पाणी करणारी माणसे बघितली तर ते एक संदेश देऊन जातात की, कष्टाची बरी भाजी, भाकरी, तूप साखरेची चोरी नको. शासन काय देईल, काय देते, कसे देते याचे लोण या श्रमिकांपर्यंत पोहचलेच नसेल, हे या दृष्यातून व त्यांचा जीवनातील संघर्षातून पारदर्शकपणे दिसत होते.

निरागस हास्य हेच सामर्थ्य

उद्याच्या उज्ज्वल भविष्यातल्या त्यांच्या या निरागस बाळाच्या चेहऱ्यावरील हास्य हेच त्यांच्या श्रमाचा थकवा काढण्याचे औषध व त्यांचे सामर्थ्य असेल, का हे न सुटणार कोडच म्हणावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT