Students of Savitribai Phule Vidyalaya asking for help for their injured friends.
Students of Savitribai Phule Vidyalaya asking for help for their injured friends.  esakal
जळगाव

Jalgaon News : कोमात गेलेल्या विद्यार्थ्यासाठी सरसावली शाळा; मदत फेरीतून 10 हजारांचे सहाय्य!

शंकर भामेरे

(पहूर जि. जळगाव) : झाडाची फांदी डोक्यावर पडल्यामुळे मेंदूला मार लागून कोमात (Coma) गेलेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय मदतीसाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पुढे सरसावले असून, 'एक हात मदतीचा' या मदतफेरीद्वारे १० हजार रुपयांची मदत पालकांच्या स्वाधीन केली आहे. (Students and teachers of school help student in coma provide assistance of Rs 10000 to parents jalgaon news)

पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सहावीमध्ये शिकणारा विष्णू गणेश कुमावत हा हिवरखेडा (ता. जामनेर) येथील विद्यार्थी शनिवारी दुपारी तीनला पिंपळाची फांदी डोक्यात पडल्याने गंभीररित्या जखमी झाला. त्याला तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यास पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास जळगाव येथेच डॉ. डाबी यांच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, तिथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या ५ दिवसांपासून तो बेशुद्धावस्थेत असून, डॉक्टर त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

शाळा धावली मदतीला

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे मदतीसाठी देऊन शिक्षकांच्या सहकार्याने गावातून तसेच बसस्थानक परिसरातून 'एक हात मदतीचा' हा उपक्रम राबवत माणुसकीचे दर्शन घडविले. या उपक्रमाद्वारे १० हजार रुपयांचा निधी संकलित झाला असून, हा निधी जखमी विष्णूचे वडील गणेश कुमावत यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

मदतीचे आवाहन

जखमी विष्णूची घरची परिस्थिती हालाखीची असून, आई आणि वडील शेतमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अचानक आलेले हे संकट दूर करण्यासाठी ग्रामस्थ मदत करत आहेत.

हिवरखेडा येथील भाऊराव पाटील, भास्कर पाटील, उत्तम पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी वाकोद, हिवरखेडा, पिंपळगाव, वडगाव, हिवरी येथेही मदतीसाठी पदर पसरवून उपचारासाठी निधी संकलित केला आहे. विष्णू गणेश कुमावत या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी दात्यांनी मदत करण्याचे आवाहन पालकांनी केले आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT