In a program organized at Godavari CBSE School, while informing the students about 'ISTRO', Dr. Chandramouli Joshi. esakal
जळगाव

Jalgaon News : ‘इस्त्रो’च्या अंतराळ प्रवासाने विद्यार्थी थक्क; डॉ. जोशींनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘इस्रो’तील माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ भरत चनियारा तसेच रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमाऊली जोशी गोदावरी सीबीएसई स्कूलमधील विद्यार्थ्यांना व्याख्यानातून अंतराळ तंत्रज्ञानातील ‘इस्त्रो'चा प्रवास उलगडून सांगितला. (Students are amazed at ISRO space travel Information given by dr Joshi jalgaon news)

प्रा. जोशी म्हणाले, की ‘इस्रो'ची स्थापना १९६२ मध्ये झाली. भारताच्या अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाला ‘भारतीय अंतराळ संशोधन समिती’ असे म्हटले जात होते. डॉ. विक्रम साराभाई त्याचे प्रमुख होते.

त्यावेळी मोजक्या शास्त्रज्ञांची ‘टीम' होती. आर्थिक पाठबळ नव्हते. १९६२ मध्ये इंडियन नॅशनल कमेटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना केली. डॉ. साराभाई यांच्या नेतृत्वाखाली तिरुवनंतपुरम येथे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची स्थापना केली.

पहिले रॉकेट प्रक्षेपण

भारताने १९६३ मध्ये अंतराळात पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. वातावरणातील हवेचा अभ्यास करण्यासाठी ‘साऊडिंग' रॉकेटला थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आले.

सध्या हे केंद्र विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखले जाते. ‘इस्रो' हे भारतीय विज्ञानाचा सर्वांत मोठा विजय आहे, ही देशाच्या अंतराळ संपत्तीच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळते.

सध्या अंतराळ संशोधनात सुमारे १७ हजार जण कार्यरत आहेत. डॉ. जोशी यांनी मुलांना मुख्य केंद्र उपग्रह तंत्रज्ञान, आवाज करणारे रॉकेट, ‘इस्रो'चा इतिहास, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वहन, उपग्रह कक्षाचे वेगवेगळे प्रकार, उपग्रहाचे प्रकार, नाविक (दिक्चालन यंत्रणा) सॅटेलाईट नेव्हीगेशन सिस्टीम याबद्दल माहिती दिली. भविष्यात ‘इस्रो'चे काय उद्देश याचीही माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT