MPSC students esakal
जळगाव

Jalgaon : MPSC ची मुख्य परिक्षा न झाल्याने विद्यार्थी तणावात

देवीदास वाणी

जळगाव : ‘एमपीएससी’ची मुख्य परिक्षा २०२०’ (MPSC Mains Exam 2022) न झाल्याने या परिक्षेचे उमेदवार सध्या आर्थिक व मानसिक तणावाखाली आहेत.ही परिक्षा लवकर घेऊन भरती प्रक्रियेचा प्रश्न तत्काळ सोडवावा, उर्वरित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी सोमवारी (ता.२३) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. या परिक्षेचे तेरा हजार परीक्षार्थी आहेत. त्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न परिक्षा न झाल्याने निर्माण झाला आहे. (Students gave Statement to collector for conducting MPSC main exam Jalgaon News)

नरेंद्र पाटील, श्याम कोळी, मुकेश पाटील, स्वप्नील पाटील, अजय गवळी, अविनाश वाघ, अमोल पाटील, नीलेश दळवी, दीपक सुसूंद्रे, रणधीर पवार, प्रमोद तावडे आदी परिक्षार्थींचा स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.

या परिक्षेच्या पूर्व परीक्षेला तब्बल अडीच वर्षे उलटून गेली असून संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या कारणामुळे २२ व २९ जानेवारी २०२२ रोजी नियोजित मुख्य परिक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे. उच्च न्यायालयात याबाबत याचिका १७ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल झालेली आहे. चार महिने उलटून देखील आजवर यावर एकही सुनावणी झालेली नाही. यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मानसिक व आर्थिक तणावात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT