sakal
जळगाव

अजिंठा लेणीच्या धबधब्यात पडलेल्या तरुणांला वाचवण्यात यश

सकाळ प्रतिनिधीच्या सतर्कता मुळे यंत्रणा सज्ज

सकाळ डिजिटल टीम

तोंडापूर: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या सत्पकुंड धबधबा जवळ सेल्फी काढतांना जळगाव येथील तरूण आज दि १६ रोजी दुपारी ४ च्या सुमारास पडला असता पुरातत्त्व खात्त्याच्या कर्मचारी व अजिंठा लेणी सुरक्षा संरक्षक पोलीस यांच्या प्रयत्नामुळे जिवदान मिळाले आहे.

जळगाव येथील सिव्हिल दवाखान्यातील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय जळगाव येथील २५ मुले व मुली अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले असता निसर्गरम्य वातावरणचा मोह न आवरल्यामुळे लेणीतील सप्तकुंड धबधबावर फोटो काढताना सेल्फीच्या नादात पाय सटकुन देवांशु राजेश मोर्ये वय २१ हा पहिल्या डोहात पडला असता, मित्रांनी आराडा ओऱड केल्याने फर्दापुर येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी अनिल रावळकर हे घटना स्थळावर हजर असल्याने त्यांनी तात्काळ पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी व सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी यांना बोलावून घेतले, व त्यांच्या मदतीने दोराच्या साहाय्याने त्याला सुरक्षित वर काढण्यात आले.

देवांशु मोर्ये हा दुसऱ्या वर्षी मेडिकल शिक्षण घेत असून, तो मुळचा पालघर येथील नालासोपारा येथील रहिवाशी आहे. जळगाव येथील सिव्हिलच्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे उप.पोलिस निरीक्षक युवराज शिंदे व पोलिस कर्मचारी यांच्या शर्यतीचे प्रयत्नामुळे जिवदान मिळाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT