MLA Anil Patil while felicitating Yogesh Koli who was appointed as an officer in Union Bank esakal
जळगाव

Success Story : अपंगत्वावर मात करत योगेश युनियन बँकेत बनला अधिकारी!

सकाळ वृत्तसेवा

Success Story : अथक प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर डांगरी येथील अंध योगेशने स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळवली आहे. योगेशच्या धडपडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Success Story Yogesh overcame disability and became an officer in Union Bank jalgaon news)

तालुक्यातील डांगरी येथील योगेश शांताराम कोळी हा जन्मताच १०० टक्के अंध. त्याचे वडील मजुरी करीत असतात. मिळेल त्या काम करून कुटुंबा ते उदरनिर्वाह करतात. दहावीपर्यंत धुळे येथे अंध मुलांच्या शाळेत योगेशने शिक्षण घेतले.

पुढे काय हा प्रश्न सतावत असताना, ज्येष्ठ मित्र कामाला आले. त्यांनी मुंबईला शिक्षण घेण्याचा सल्ला दिला आणि योगेशने मुंबई गाठली. तोडकी मोडकी रक्कम घरून घेऊन हॉस्टेल, कॉलेज फी, इतर खर्च भागविणे अशक्य होते.

काही सेवाभावी संस्था मदतीला आल्या. पदवीधर होईपर्यंत हॉस्टेल मिळणे अवघड होते. अशात माजी मंत्री धनंजय मुंढे भेटले. त्यांनी मुलासारखे जवळ केले व तोडगा काढला आणि हॉस्टेलची सोय केली.

मुंबईसारख्या शहरात रिया कॉलेज, विद्यापीठ फी आणि इतर खर्च भागविण्यासाठी रेल्वेत रुमाल, पाकीट विकले आणि स्वतःचा खर्च भागविला.

शिक्षणाबरोबर इतरही क्षेत्रात योगेशने मजल मारली. कबड्डी, सायकलिंग, बुद्धिबळ, मॅरेथॉन या क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट सहभाग घेतला. ऑल इंडिया बुद्धिबळ स्पर्धेत तो देशात दुसरा आला आहे. आता स्पर्धा परीक्षा देऊन युनियन बँकेत त्याने नोकरी मिळविली आहे.

बच्चू कडू यांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना मदत करतो. या यशाबद्दल आमदार अनिल पाटील, अनिल शिसोदे आदींनी योगेशचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT