जळगाव

पोलिस धावले वाचविण्यासाठी आणि काही सेकंदातच गेला जीव 

रईस शेख

जळगाव : ‘ताई मी जातेय. तुम्ही लक्ष द्या घराकडे, सचिनला सांभाळा’, असा निरोपाचा फोन जेठाणी शोभा चौधरी यांना करून दिराणीने धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. विमलबाई काशीनाथ चौधरी (वय ५५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे व पथकाने त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, काही सेकंदापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले होते. याबाबत तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. 

आवर्जून वाचा- सोने खरेदी करण्याचा 'गोल्डन चांन्स' ! सोन्याचा आज काय आहे भाव, जाणून घ्या    

शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा चौधरी  माहेरी निघाल्या होत्या. वाटेतच त्यांना दुपारी साडेबाराच्या सुमारास देराणी विमलबाई यांनी फोन केला. ‘ताई मी जातेय. आता तुम्ही घराकडे लक्ष द्या, अन्‌ सचिनला सांभाळा’, असे शब्द ऐकताच शोभा चौधरींना संशय आला. त्यांनी ‘कुठंय तू’ असे विचारणा केल्यावर त्यांनाही धक्का बसला. आसोद्याकडे रेल्वे मार्गावरून विमलबाईने फोन केला होता. काही होण्याच्या आतच जेठाणी शोभा चौधरींनी निरीक्षक विठ्ठल ससे यांना मोबाईलवरून घटना सांगितली. त्यांनीही गांभीर्य ओळखून तत्काळ वाहन काढून रेल्वे रुळाकडे धाव घेतली. ‘तुम्ही त्यांना फोन करून बोलण्यात व्यस्त ठेवा. आपण त्यांना वाचवू, आम्ही पेाचलोय रेल्वे गेटवर’, असा विश्‍वास श्री. ससे यांनी शोभा चौधरी यांना दिला अन्‌ काही सेकंदातच विमलबाईंनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. 

कुटुंबीयांचा टाहो... 
दुर्घटना घडल्यानंतर मेहरूण, रामेश्‍वर कॉलनीतील नातेवाईक, कुटुंबीयांनी धाव घेतली. अर्ध्याच तासात शोभा चौधरी थेट जिल्‍हा रुग्णालयात धडकल्या. रोज कमावून खाणारे कुटुंब. घरात पती काशीनाथ चौधरी, मुलगा सचिन असे राहतात. अनेक वर्षे भाड्याच्या खोलीत राहत असल्याने नुकतेच त्यांना शोभा चौधरींनी गल्लीतच स्वतःचे घर करून दिले होते. कुटुंबातील कर्ती महिला गेल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. मुलगा सचिन याने आईसाठी टाहो फोडत आक्रोश केला. 

कारण अस्पष्टच... 
विमल चौधरी मुलगा सचिनला घेऊन नेहमीप्रमाणे सकाळी सातला भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीला गेल्या होत्या. अकारापर्यंत भाजीपाला विकून कोणास काही न सांगता विमलबाई रिक्षाने निघून गेल्या. ‘आताच डोळ्यादेखत गेली अन्‌ असं कसे शक्य आहे’ असे म्हणत अनेकांचा या घटनेवर विश्‍वास बसत नव्हता. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पोलिस नाईक विलास शिंदे तपास करीत आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT