Crime Against Girl esakal
जळगाव

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयिताला अटक

संशयित आरोपी, लक्ष्मण मोरे याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : प्रेम प्रकरण असलेल्या मुलासोबत लग्न लावून देण्याची मागणी आई -वडिलांनी फेटाळलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत, अत्याचार केल्याची घटना घडली होती पळून जाणाऱ्या मुलीसह तरुणाला पोलिसांनी तामसवाडी येथून अटक केली आहे. (Suspect arrested in rape of minor girl Jalgaon Crime)

पळून गेल्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण अण्णा मोरे याला ७ जानेवारी रोजी मेहुणबारे पोलिसांनी अटक केली असून त्याला सोमवार (ता.८) दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली. १६ वर्षीय मुलगी व तामसवाडी (ता.चाळीसगाव) येथील लक्ष्मण मोरे यांचे प्रेम जुळले होते.

त्यामुळे मुलीने तिच्या वडिलांकडे लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला. त्या वेळी दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सटाणा येथे पळून गेले व तेथे एका शेतात राहिले.

त्याचदरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आले. त्यानंतर दोघांना मेहुणबारे पोलिसांनी तामसवाडी येथून ७ जानेवारी रोजी अटक केली. सुरवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात मुलीच्या जबाबावरून बलात्कार, पोस्को कलम वाढविण्यात आले. सं

शयित आरोपी, लक्ष्मण मोरे याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली. ॲड. नीलेश चौधरी यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT