robber jubair tadavi esakal
जळगाव

Jalgaon : बॅंक लुटण्याच्या प्रयत्नातील संशयित ताब्यात

चंद्रकांत चौधरी

पाचोरा (जि. जळगाव) : वरखेडी (ता. पाचोरा) येथील महाराष्ट्र बँकेत लुटीचा प्रयत्न करणारा अट्टल घरफोडया (Burglary) जुबेर तडवी (वय २२) याला जळगावच्या गुन्हे शाखेने पहूर बाजारपेठेतून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. (Suspect in bank robbery attempt arrested Jalgaon crime News)

वरखेडी येथील महाराष्ट्र बँकेत लुटीचा प्रयत्न करण्याची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार श्री. बकाले यांनी उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील यांचे पथक तयार केले. पथकाने वरखेडी येथील महाराष्ट्र बँक व परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ पाहून संशयिताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, तो कासली (ता. जामनेर) येथील जुबेर तडवी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याआधारे पोलिसांच्या पथकाने कासली येथे जाऊन शोध घेतला असता, जुबेर हा पहूरच्या बाजारपेठेत असल्याचे समजल्यानंतर त्याला पहूर येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT