A police team with two wheelers seized from the arrested suspect from Ajantha Chowk. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चोरीच्या 7 दुचाकींसह संशयित पोलिसांच्या ताब्यात; जिल्हापेठ ठाण्याच्या पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या संशयितास जिल्हापेठ पोलिसांनी अजिंठा चौकातून अटक केली. त्याच्याकडून सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.(Suspect in police custody along with 7 stolen bikes jalgaon crime news)

जिल्हापेठ ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पथकात गुन्हे शोध पथकाचे हवालदार सलीम तडवी, पोलिस नाईक जुबेर तडवी, शिपाई अमितकुमार मराठे, रवींद्र साबळे, तुषार पाटील यांचा समावेश होता.

सीसीटीव्ही आणि जनरल फुटेजच्या आधारे संशयित राकेश पंडित भाट (वय २४, रा. मोठे वाघोदे, ता. रावेर) हा अजिंठा चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (ता.३०) दुपारी तीनला सापळा रचून संशयितास अटक केली.

त्याने चोरीच्या सहा दुचाकी काढून दिल्या आहेत. संशयित राकेश याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ४, भुसावळ शहरात १, एमआयडीसी पोलिस ठाण्यात २ अशा ७ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur : क्रूझरचा टायर फुटला, ट्रॅक्टरला धडकून भीषण अपघात; ५ भाविकांचा मृत्यू, ७ ते ८ जण जखमी

शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं, तिथेच ठाकरे सेनेचे पंख तुटले; काँग्रेसची ताकद झाली क्षीण, राष्ट्रवादीला करावी लागणार कसरत!

New Labour Rules for Women Workers : महिला आणि गिग कामगारांसाठी मोठी खुशखबर! आजपासून नवे नियम लागू! जाणून घ्या काय सुविधा मिळणार?

Neha : 18 वर्षांचं करियर, 14-15 चित्रपट, 9 तर निघाले फ्लॉप..तरीही आज 40,00,00,000 कोटी संपत्तीची मालकीण, राजकीय घराण्याशी खास कनेक्शन

CET Exam : मार्च ते मे दरम्‍यान परीक्षा! इंजिनिअरिंग, फार्मसीसह विविध सीईटी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT