cleanliness  esakal
जळगाव

Jalgaon Swachhata Hi Seva Activity : जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छताही सेवा’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Swachhatahi Seva Activity : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता. १५) येत्या २ ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छताही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी व कचरामुक्त देशासाठी लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत यांनी केले आहे. (swachhata hi Seva initiative in district from today Jalgaon news)

यामध्ये दृश्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अभियानात ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी ठिकाणी स्वच्छता केली जाणार असून, सिंगल युज प्लास्टिक वापर व त्याचे दुष्परिणाम याबाबत गावांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर चित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेट्या ठेवणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपक्रमास प्रारंभ होईल. केंद्रीय मंत्री, सरपंच, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, तसेच शहरी व ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी संवाद साधतील, असे श्री. अंकीत यांनी सांगितले.

ओडीएफ प्लस मॉडेल झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारी स्वच्छता कायम टिकण्यासाठी ग्रामपाणी पुरवठा, स्वच्छता समिती व ग्रामस्थांनी लोकसहभागातून श्रमदानाने स्वच्छता करावी, असे आवाहन प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता) यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT