team of Food and Drug Administration seized stock of banned Vimal Gutkha from vehicle jalgaon crime news
team of Food and Drug Administration seized stock of banned Vimal Gutkha from vehicle jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon News : मुक्ताईनगरात लाखोंचा गुटखा पकडला; विधानपरिषदेत गुटखा तस्करी गाजताच कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : शहरातील या प्रवर्तन चौकात गुरुवारी (ता.२) रात्री आठच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एका वाहनातून (Vehicle) प्रतिबंधित विमल गुटख्याचा साठा पकडला. (team of Food and Drug Administration seized stock of banned Vimal Gutkha from vehicle jalgaon crime news)

हा साठा पथकाने जप्त केला असून, त्याची किंमत अंदाजे ५० लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी आर.एम. भरकड आणि उपायुक्त कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आमदार एकनाथ खडसे यांनी आजच विधानपरिषदेत मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित केला होता. यात त्यांनी प्रामुख्याने मध्य प्रदेशातून गुटखा मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यात येत असून,

यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर काही तासांमध्येच ही कारवाई करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने कारवाईचा तपशील अद्याप समजला नाही.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

..हे तर हिमनगाचे टोक : खडसे

दरम्यान, या संदर्भात आमदार खडसे यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, आज मुक्ताईनगरात मोठी कारवाई झाली असली तरी हे तर फक्त हिमनगाचे टोक आहे.

मुक्ताईनगरसह जिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून, याचबाबत मी आज विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित केला. यानंतर मी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी बोललो. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी हा एका बड्या पुढाऱ्याचा जवळचा व्यक्ती असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT