Department of Revenue esakal
जळगाव

Jalgaon News : तहसील कार्यालयात साडेतीनशे फायली निकाली; संपानंतर कार्यालये गजबली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नायब तहसीलदार, तहसीलदारांचा संप, सलग तीन दिवसांच्या शासकीय सुटीनंतर सोमवारी (ता. १०) जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांत तहसीलदार, नायब तहसीलदारांनी काम सुरू केले. (Tehsildar Namdev Patil signed 700 files and forwarded them in one day jalgaon news)

जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सव्वाशे फायलींवर एकाच दिवसात सह्या करून पुढे पाठविल्या, तर इतर नायब तहसीलदांनी अडीचशे फायली निकाली काढल्या. एकट्या तहसीलदार कार्यालयात सुमारे साडेतीनशे फायली एकाच दिवसात निकाली निघाल्याने नागरिकांची कामे होऊ लागली आहेत.

तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांना ग्रेड पे ४८०० रुपये मिळावा, या मागणीसाठी ३ एप्रिलपासून तहसीलदार, नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले होते. गुरुवारी (ता. ६) सायंकाळी संप मिटला. मात्र, शुक्रवारी (ता. ७) सुटी असल्याने शासकीय कार्यालये बंद होती. शनिवारी (ता. ८) व रविवारी (ता. ९), अशा सलग तीन दिवस सुटी होती. त्यामुळे सोमवार (ता. १०)पासून महसूल विभागाच्या कामांना गती आली. मात्र, संप मिटल्याने शासकीय कार्यालयांत नागरिकांची गजबज वाढली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

संपकाळात फक्त कर्मचारी कामावर होते. मात्र, तहसीलदार, नायब तहसीलदार नसल्याने नागरिकांच्या प्रकरणांवर सह्या करणार कोण, अशी स्थिती तहसीलदार कार्यालयात होती. मार्चमध्ये सात दिवस शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यामुळे नागरिकांची कामे रखडली होती. नंतर तहसीलदार, नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन केल्याने नागरिकांची कामे पुन्हा ठप्प झाली होती.

शासनाने २०१५ मध्ये नायब तहसीलदारांना ४८०० ग्रेड पे देण्याबाबत तत्त्वतः मान्यता दिली. त्यानंतर आलेल्या बक्षी समितीने या मागणीचा विचार केला नाही, तसेच शासनानेही याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. महसूल मंत्र्यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नंतर मागण्या मंजुरीचे आश्‍वासन मिळाले. त्यामुळे संप मागे घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT