Tehsildar office work stopped due to Tehsildar Naib Tehsildar went on indefinite strike  esakal
जळगाव

Jalgaon News : महसूल विभागाचे कामकाज ठप्पच; नायब तहसीलदार, तहसीलदारांचे कामबंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांना ग्रेड पे ४८०० रुपये मिळावा, या मागणीसाठी गेल्या सोमवार (ता. ३)पासून तहसीलदार, नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले आहेत. ते बुधवारीही (ता. ५) संपावर होते. (Tehsildar office work stopped due to Tehsildar Naib Tehsildar went on indefinite strike jalgaon news)

यामुळे सर्वच तहसीलदार कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत घोषणाबाजी केली. ‘तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचा विजय असो’, ‘हम सब एक है’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ आदी घोषणांनी परिसर दणाणला होता.

कर्मचारी कामावर आहेत. मात्र, साहेब नसल्याने नागरिकांच्या प्रकरणांवर सह्या करणार कोण, अशी स्थिती तहसीलदार कार्यालयात आहे. मार्च महिन्यात सात दिवस शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यामुळे नागरिकांची कामे रखडली होती. आता तहसीलदार, नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने नागरिकांची कामे पुन्हा ठप्प झाली आहेत.

१९९८ ला नायब तहसीलदार वर्ग २ राजपत्रित पद करण्यात आले. मात्र, ग्रेड पे वर्ग ३ चाच ठेवण्यात आला. समकक्ष वर्ग २ अधिकारी यांचा ग्रेड पे जास्त आहे. नायब तहसीलदार महत्त्वाचे पद असून, अनेकवेळा समन्वयाची भूमिका पार पाडावी लागते. नायब तहसीलदारांचा ग्रेड पे वाढविण्यासाठी अनेकवेळा शासनाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

वेळोवेळी वित्त आयोग, तसेच बक्षी समितीसमोर या विषयावर सादरीकरण करण्यात आले आहे. शासनाने २०१५ मध्ये नायब तहसीलदारांना ४८०० ग्रेड पे देण्याबाबत तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानंतर आलेल्या बक्षी समितीने या मागणीचा विचार केला नाही. शासनाने याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तहसीलदार महेंद्र माळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, तहसीलदार पंकज लोखंडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, सुनील समदाणे आदींनी आंदोलनात भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT