Winter News esakal
जळगाव

Jalgaon Winter Update: जिल्ह्यात थंडीच्या लाटेने भरली हुडहुडी! जनजीवन प्रभावित शेकोट्यांनी ऊब मिळविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Winter Update: जिल्ह्यात सोमवारी (ता. १८) मध्यरात्रीपासून उत्तरेकडील थंडगार वाऱ्याचा वेग वाढला आहे. यामुळे तापमानाचा पारा १२.५ अंशांपर्यंत खाली आला. थंडीची ही लाट २५ डिसेंबरपर्यंत कायम राहील, असे हवामान अभ्यासक, वेलनेस वेदरचे संचालक नीलेश गोरे यांनी सांगितले.

जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमान कमी झाल्याने थंडी सुरू झाली होती; पण ती इतकी बोचरी नव्हती, किंबहुना यंदा थंडीचा फार जोर नाही, असाच सर्वत्र सूर होता. सोमवारी मध्यरात्रीपासून शहरासह जिल्ह्यात थंडी वाढली आहे. (Temperatures drop to 12 degrees Celsius in jalgaon news)

उत्तरेकडून अतिगार वारे महाराष्ट्रात वाहू लागले. या वाऱ्यांचा वेग प्रतितास १८ असा आहे. जळगाव जिल्ह्यात आजचे किमान तापमान १२.५, तर कमाल तापमान २६ अंश नोंदविले गेले. सोमवारचे किमान तापमान १४ अंश होते. आगामी २५ डिसेंबरपर्यंत किमान तापमान १० ते १३ अंशांदरम्यान राहील, असे सांगण्यात आले. कमाल तापमान २४ ते २६ डिग्रीदरम्यान असेल.

थंडीचा कडाका वाढल्याने नागरिक गरम कपडे घालू लागले आहेत. गरम पाणी, चहा अधिक वेळा घेताना दिसतात. सोबतच रात्री शेकोट्या पेटवून ऊब मिळवू लागले आहेत. शेकोट्यांवर विविध गप्पा रंगताना दिसतात.

ज्येष्ठ, बालकांची काळजी घ्या

थंडीच्या कडाक्याचा बालके, ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम होऊन सर्दी, खोकल्याचा त्रास तसेच ज्येष्ठांना सांधेदुखी सुरू होते. बालकांना सतत गरम कपडे घालावेत. कान व नाक रूमालाने किंवा मफलर बांधावे. शक्यतोवर गरम पाणी प्यावे, गरम अन्न घ्यावे. हृदयविकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. सकाळी फिरायला जावे. युवकांनी व्यायाम करावा, असा सल्ला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिला आहे.

"उत्तर भारतात सध्या प्रचंड थंडीची लाट पसरली आहे. पारा चार ते आठ अंशांवर घसरला असून, बर्फासह धुक्याची चादर पसरली. उत्तरेकडून थंड वारे वाहून नेण्यासाठी अनुकूल असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य प्रदेश व महाराष्ट्रावर अस्तित्वात येत आहे. यामुळे थंडी वाढली." - नीलेश गोरे, संचालक, वेलनेस वेदर, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT