जळगाव

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा सवलतीचे गुण !

उमेश काटे




अमळनेर : यंदाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात परीक्षा देणाऱ्या दहावी, बारावीच्या (Tenth, twelfth examination) विद्यार्थ्यांना (Student) क्रीडा (Sport) सवलतीचे गुण (Marks) देण्यात यावेत, यासाठी गेल्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य शासनाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ (State Government Room Officer Vivek Sapkal) यांनी दिले. ही सवलत केवळ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परीक्षेसाठीच देण्यात येत आहे, हे विशेष!

(tenth and twelfth students will get sports concession marks)

कोविड-१९ या महामारीमुळे असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. २०२०-२१ या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात, दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देताना आठवी व नववीत घेतलेल्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा. तसेच त्या विद्यार्थ्यास केवळ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठीच सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत. तसेच २०२०-२१ या वर्षात बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत गेल्या वर्षीचे अर्थात, अकरावीच्या विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा, अन् या विद्यार्थ्यांनाही केवळ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठीच सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत.

दरम्यान, याबाबत शालेय शिक्षण विभागाने ८ फेब्रुवारी २०२१ ला क्रीडा सवलत गुणाबाबतचे पत्र दिले होते. या पत्राच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव (पुणे) यांना शुक्रवारी पत्राद्वारे कळविले आहे. राज्य शिक्षण आयुक्तालयाचे आयुक्त ( शिक्षण) (पुणे) यांना ही कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT