गतवर्षीपेक्षा कापसाला एक हजाराने जादा भाव sakal
जळगाव

जळगाव : गतवर्षीपेक्षा कापसाला एक हजाराने जादा भाव

तुटवडा जाणवेल म्हणून आजच्या स्थितीत ८ हजारांचा दर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने कपाशीचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे ऐन ‘सिझन’मध्ये कापसाचा तुटवडा जाणवेल यासाठी व्यापाऱ्यांनी आतापासूनच कापूस खरेदी सुरू केली आहे. गतवर्षी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाला प्रतिक्विटंल पाच हजारांचा दर होता. यंदा सहा हजारांचा दर मिळाला. सोमवारी (ता. १) तर चक्क ८ हजार २०० चा दर कापसाला मिळाला आहे. आगामी काळात कापसाचा तुटवडा जाणवेल, त्यावेळी गाठींना अधिकचा दर मिळेल, अशी आशा असल्याने व्यापारी कापसाची खरेदी करताना दिसतात.

गतवर्षी पावसाची कृपा असल्याने कपाशीचे मुबलक उत्पादन आले होते. तरीही कपाशीला पाच हजारांचा दर होता. यंदा पावसाची कृपा अन्‌ अवकृपा दोघे झाल्या. यामुळे उत्पादन चांगले आले, मात्र शेवटच्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेले कपाशीचे उत्पादन पावसामुळे खराब झाले. परिणामतः अनेक शेतकऱ्यांना कपाशीचे उत्पादन आले आहे. जे आले ते अत्यल्प आहे. ज्यांच्याकडे चांगला कापूस आहे ते बाजारात व्यापाऱ्यांकडे जाऊन कापूस विक्री करीत आहे. यंदा कापसाला सहा हजारांचा दर मिळाला.

चांगल्या दराची ही आहेत कारणे....

जेव्हा जिनिंगचा सिझन सुरू होइल तेव्हा कापसाचा तुटवडा जाणवेल, तो जाणवू नये म्हणून आतापासूनच चांगला दर देऊन कापसाची खरेदी व्यापारी करीत आहे. भविष्यात गाठींच्या किमतीत वाढ होईल, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळेल. यामुळे कापसाची खरेदी सुरू आहे. यंदा कापसाला प्रथम सहा हजार नंतर साडेसहा हजारांचा भाव मिळाला. नंतर सात हजार, साडेसात हजार आता आठ हजार दोनशेचा दर मिळत आहे.

'कापसाला सोमवारी आठ हजार दोनशेचा भाव मिळाला आहे. अधिक चांगली प्रत असेल तर अजून चांगला भाव मिळेल. यंदा कापसाचा तुटवडा जाणवेल असा अंदाज आहे. जिल्ह्यात दररोज एक लाख क्विंटल कापसाची आवक होत आहे.'

- प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT