thieves 
जळगाव

जळगावकर सावधान ः थंडीचा जोर वाढताच चोरटे सक्रिय, तीन ठिकाणी घरफोड्या 

रईस शेख

जळगाव : शहरातील विविध तीन ठिकाणे निवडून चोरट्यांनी बंद घरे फोडल्याचा प्रकार समोर आला. गणेश कॉलनीत बंद घरातून टीव्ही, लॅपटॉपसह ५० हजार, गणपतीनगरातील वृद्धाचे घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ५० हजारांचा ऐवज आणि खोटेनगरातून लहानग्यांच्या पिगी बँकेसह दहा हजारांची रोकड लंपास केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. 

पहिल्या घटनेत, गणेश कॉलनी (प्लॉट नं. ७१/१) येथे संगीता जोशी या मुलगी भारती जोशीसह वास्तव्यास आहेत. जोशी यांची मुलगी भारती ही बाहेती महाविद्यालयात एस.वाय.बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. भारती व तिची आई संगीता असे दोघेही मोठ्या बहिणीच्या प्रसूतीसाठी नाशिक येथे गेल्या होत्या. अशातच लॉकडाउन लागल्याने संगीता मुलीकडेच मुक्कामी होत्या, तर मुलगी भारती २१ डिसेंबरला आजोबा विलास कुळकर्णी यांच्यासोबत घरी परतली. या वेळी घराच्या मुख्य गेटचे कुलूप तुटलेले आढळले. 

असा ऐवज लंपास 
खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्यांनी २५ हजार रुपयांचा ३२ इंची एलईडी टीव्ही, २५ हजारांचे लॅपटॉप, तसेच पंजाब नॅशनल बँक व युनियन बँकेचे सर्टिफिकेट चोरून नेल्याचे आढळले. याबाबत भारती जोशी हिने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे. 

गणपतीनगरात घरफोडी 
गणपतीनगरातील वैभव स्टेट बँक कॉलनी परिसरातील पायोनियर क्लबसमोर कांतिलाल वर्मा (वय ७१) घरात एकटेच राहतात. सकाळ आणि सायंकाळी ते जेवणासाठीचा डबा घेण्यासाठी मुलाच्या घरी जातात, मंगळवारी (ता. २१) ते साडेबाराला घर बंद करून गेले. लगेच दुपारी १.२५ च्या सुमारास ते डबा घेऊन परत आले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ५० हजारांचा ऐवज लंपास केला. वर्मा यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. 

खाटेनगरात बंद घर फोडले 
जे. के. सीड्स कंपनीत एरिया मॅनेजर नितीनकुमार महाले (वय ३७) शुक्रवारी सकाळी दहाला खोटेनगरातील घराला कुलूप लावून कामावर गेले. त्यानंतर ते एरंडोल ते जळगाव असे अपडाउन करत होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहाला त्यांच्या घरमालकांनी घरफोडी झाल्याने महाले यांना कळविले. त्यानुसार महाले यांनी घरात येऊन पाहणी केली असता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटामधील ठेवलेली दहा हजार रुपयांची रोकड आणि लहान मुलांच्या मनी बँकेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्यांनी सोमवारी रात्री तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. 

चोरटे सक्रिय 
थंडीचा जोर वाढल्याने शहरातील नागरी वस्त्या आणि व्यापारी संस्थाने, मार्केट परिसरात चोरट्यांचा धाक निर्माण झाला आहे. थंडीत घरफोड्या आणि दरोड्यांच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT